बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. व्हिलन असो किंवा कॉमेडी पंकज त्रिपाठी यांनी विविध भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. मात्र त्यांचा हा प्रवास साधारण नव्हता. वेगवेगळ्या मुलाखतींमधुन पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या बॉलिवूडमधील संघर्षाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकत्याच ईटी टाइम्सला दिलेल्या एक मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या प्रवासाबद्दल काही खुलासा केला आहे. या मुलाखतीत ते म्हणाले आहेत. ” हे खरं आहे की बॉलिवूडमध्ये एका नव्या अभिनेत्याचा प्रवास हा खडतर असतो. हा जरा एखाद्याचं बॉलिवूडशी जुनं नातं असेल तर जरा वेगळी गोष्ट असते. बॉलिवूडमध्ये एका बाहेरच्या व्यक्तीसाठी मात्र नक्कीच मार्ग कठीण असतो. खास करूनआपल्याला आणखी संघर्ष करावा लागतो जेव्हा आपण एका खेड्यातील हिंदी मीडियममधून शिक्षण घेतलेलं असतं.” असं म्हणत पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमधील संघर्षावर वक्तव्य केलंय.

पुढे ते प्रवासाबद्दल सांगताना म्हणाले, ” माझ्या 14 वर्षांच्या अनुभवातून हा विश्वास निर्माण झालाय की एखाद्या गोष्टीने काही फरक पडत नाही. महत्वांच हे आहे की जर तुम्ही तुमच्या कलेशी एकनिष्ठ आहात, तुमचा कलेवर विश्वास आहे तर एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळेल. मी स्वत: याचं उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही स्वत: वरील विश्वास आणि आशा कधीही गमावू नका.”

बिहारमधील हिंदी मीडियम शाळेत शिक्षण

पंकज त्रिपाठी बिहारमधील हे एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी गोपालगंज या त्यांच्या गावातच हिंदी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलंय. त्यानंतर पटानामध्ये त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली. एक हॉटेलमध्ये त्यांनी काम सुरू केलं. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची आवड जडली होती. सात वर्षांनी त्यांनी दिल्लीतील नऍशनल स्कूल ऑफ ड्राममध्ये प्रवेश करून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

गेल्या 8-10 वर्षांपासून पंकज त्रिपाठी प्रसिद्धी झोतात आले असले तरी त्यांचा बॉलिवूडमधील संघर्ष 14 वर्षांचा आहे. पंकज त्रिपाठी यांनी केवळ गंभीर भूमिकाच साकारल्या नाहित. तर ‘फुकरे’ आणि ‘स्‍त्री’ सारख्या सिनेमांमधून त्यांनी विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवलं देखील आहे.