बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंकज हे ‘मीमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. प्रत्येक कलाकाराला ज्या प्रमाणे सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो, त्या प्रमाणे पंकज त्रिपाठी यांनाही सुरुवातीला संघर्ष करावा लागला. पंकज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगितले आहे.

पंकज त्रिपाठी यांनी नुकतीच ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी करिअरच्या सुरुवातीला त्यांनी कसा संघर्ष केला हे सांगितले आहे. “खरं सांगायचं झालं तर २००४ ते २०१० या काळात मी एक रुपयाही कमावला नव्हता. आमच्या घरासाठी लागणारा सर्व खर्च हा मृदुला (पंकज त्रिपाठी यांची पत्नी) करत होती. मी अंधेरीत फिरायचो आणि कोणी अभिनय करून घ्या, कोणी अभिनय करून घ्या अशी विनवणी करायचो. पण त्यावेळी कोणीही माझे म्हणणे ऐकले नाही. मात्र, आता जेव्हा मी घरी जातो, तेव्हा मला चित्रपटांच्या ऑफर या पार्किंगमध्ये मिळतात,” असे पंकज त्रिपाठी म्हणाले.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

पुढे ते म्हणाले, “मला माझ्या पार्किंगमध्ये दिग्दर्शक दिसतात आणि ते विचारतात तु कुठे आहेस? मला तुझ्यासोबत एक चित्रपट करायचा आहे, कृपया एकदा कहाणी ऐकूण घे. पूर्वी मी संघर्ष केला पण मला काम मिळाल नाही, एवढंच नाही तर जेव्हा मी अंधेरीत शोधत होतो तेव्हासुद्धा काम मिळालं नाही. मात्र, आता माझ्या पार्किंगमध्ये चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. माझा संघर्ष सुरु होता तेव्हा घराच्या भाड्यापासून गरजेच्या सगळ्या गोष्टींचा खर्च हा मृदलाने केला.”

आणखी वाचा : ‘तिला हाडांच्या डॉक्टरांची गरज आहे..’, बॉडी पॉश्चरमुळे नोरा झाली ट्रोल

पंकज त्रिपाठी सध्या क्रिती सेनॉनसोबत ‘मीमी’ या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही शेवटच्या क्षणी बदलण्यात आली होती. हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

‘मीमी’ हा चित्रपट समृद्धी पोरे यांच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘मला आई व्हायचंय!’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘मीमी’ चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात क्रिती आणि पंकज त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त मनोज पाहवा, सई ताम्हणकर आणि सुप्रिया पाठक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.