19 September 2020

News Flash

मी काहीही गैर वागलो नाही; आरोपांवर पपॉनचे स्पष्टीकरण

'या प्रकरणाची चर्चा थांबवावी'

पपॉन

अंगर्ग पपॉन महंत म्हणजेच लोकप्रिय गायक पपॉनने त्याच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाशी असभ्य वर्तन केल्याप्रसंगी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन स्पर्धक असणाऱ्या एका मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली. मी काहीही गैर वागलो नाही असे म्हणत या सर्व प्रकरणी पपॉनने ट्विटरवर पोस्ट करत त्याची बाजू मांडली आहे.

‘मला ओळखणाऱ्यांना हे चांगलंच माहित असेल की मी सर्वांशी किती मिळून मिसळून आणि प्रेमाने वागतो. हा माझा स्वभावच आहे. ज्या ११ वर्षीय मुलीचा उल्लेख केला जात आहे, ती मला तिचा आदर्श मानते. तिच्याप्रती स्नेहभावना दाखवण्यात काहीच गैर नाही. जर माझ्या वागणुकीत काही आक्षेपार्ह असतं, तर मी स्वत:हून तो व्हिडिओ फेसबुकवर का पोस्ट केला असता? मी लोकांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणाला इथेच पूर्णविराम द्यावा. या प्रकरणाशी जे संबंधित लोक आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होत असेल याचा विचार करावा. मी विवाहित असून मला दोन मुलं आहेत. लोकांनी जो काही अर्थ काढला आहे, त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबियांना आणि माझ्या कुटुंबियांनाही मानसिक धक्का पोहोचला आहे,’ असे स्पष्टीकरण त्याने दिले. त्याचबरोबर माझे विचार कितीही शुद्ध असले तरी एका मुलीला स्पर्श करणे चुकले असं म्हणत त्याने माफीही मागितली.

सुप्रीम कोर्टाच्या वकील रुना भुयान यांनी पपॉनविरोधात ‘पोस्को’ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. तर ११ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पपॉनची बाजू घेत त्याचे काहीच चुकले नसल्याचे म्हटले. प्रसिद्ध गायक सोना मोहपात्रानेही पपॉन निर्दोष असल्याचे म्हटले. ‘पपॉनने जागरुकतेने वागणे, मर्यादा राखणे गरजेचे होते. पण त्याने हे जाणूनबुजून केले नसून तो निर्दोष आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.

याप्रकरणी सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असून अनेकांनी पपॉनला साथ दिली आहे. तर आसाममध्ये पपॉनच्या फॅन क्लबने (पपॉनिस्ट) दिसपूर पोलीस ठाण्यात ४० सोशल मीडिया अकाऊंट्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पपॉनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 12:05 pm

Web Title: papon reveals his side of the story stating he is not guilty on sexual assault allegations
Next Stories
1 PHOTOS: कानपूरमध्ये अंकित तिवारीचा विवाहसोहळा संपन्न
2 ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी कर्जत महोत्सवास येणार
3 Top 10 News: वैभव तत्ववादीपासून ते मणिकर्णिका कंगनापर्यंत…
Just Now!
X