News Flash

Video : गर्लफ्रेंडच्या नावाऐवजी आता बिग बॉसचा डोळा; ब्रेकअपनंतर पारस छाब्राने मिटवला टॅटू

'बिग बॉसने माझे डोळे उघडले'; पारसने गोंदवला नवा टॅटू

‘स्प्लिट्सविला ८’, ‘बिग बॉस १३’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पारस छाब्रा. पारस कायम त्याच्या पर्सनालिटी आणि फॅशन स्टाइलमुळे चर्चेत येत असतो. मात्र यावेळी तो अन्य एका कारणामुळे चर्चेत आला आहे. आकांक्षा पुरीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पारसने तिच्या नावाचा टॅटू हटवला आहे. विशेष म्हणजे या टॅटूच्या जागी त्याने नवीन टॅटू गोंदवून घेतला असून हा नवा टॅटू चर्चेचा विषय ठरत आहे.

पारस आणि आकांक्षा गेल्या कित्येक काळापासून एकमेकांना डेट करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वैचारिक मतभेद झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर पारसने आकांक्षाच्या नावाचा गोंदवलेला टॅटूनही काढून टाकला आहे. मात्र हा टॅटू काढून त्या जागी त्याने नवा टॅटू गोंदवून घेतला आहे. या नव्या टॅटूचा एक व्हिडीओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Bigg boss ne meri aankh khol di #biggboss #abrakadabraparaschhabra #paraschhabra

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra) on

पारसने आकांक्षाचं नाव मिटवत त्याजागी बिग बॉस या रिअॅलिटी शोचा लोगो हातावर काढून घेतला आहे. म्हणजे आता त्याच्या हातावर बिग बॉसचा डोळा हा नवा टॅटू दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत बिग बॉसने माझे डोळे उघडले, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, आकांक्षानेदेखील पारसच्या नावाचा टॅटू काढला होता. मात्र ब्रेकअपनंतर तिनेही तो काढून टाकला. पारस आणि आकांक्षा यांच्या विभक्त होण्यामागे बरीच कारणं आहेत. यात बिग बॉसच्या घरात माहिरा खान आणि पारस यांच्यात जवळीकता वाढली होती. तसंच पारसने अनेक वेळा या कार्यक्रमात आकांक्षावर काही आरोप-प्रत्यारोप केले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:23 pm

Web Title: paras chhabra removed ex girlfriend akanksha puri tattoo replaces it with bigg boss eye video ssj 93
Next Stories
1 ऐश्वर्याचा कोणता गुण सर्वाधिक आवडला? जया बच्चन म्हणाल्या…
2 सोनाली कुलकर्णीने स्वीकारलं ३७ दिवसांचं फिटनेस चॅलेंज
3 सुशांतसाठी अभिषेक कपूर करणार अन्नदान; पत्नीही देणार साथ
Just Now!
X