News Flash

मला वाटतं तो व्यक्ती निर्दोष आहे; झोमॅटो प्रकरणावर परिणितीचे ट्वीट व्हायरल

सध्या तिचे हे ट्वीट चर्चेत आहे.

ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला आहे. घरात घुसून आपल्याला मारहाण झाली असल्याचे महिलेने सांगितले आहे. त्यानंतर झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की महिला चपलेने मारहाण करु लागल्याने तेथून पळून आलो आणि त्या महिलेचा हात चुकून तिच्या नाकाला लागला. त्यानंतर तिच्या नाकातून रक्त वाहू लागले. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री परिणिती चोप्राने केलेले ट्वीट चर्चेत आहे.

परिणितीने ‘झोमाटो इंडिया – कृपया सत्य शोधा आणि जाहीरपणे कळवा… जर तो माणून निर्दोष असेल (आणि मला विश्वास आहे की तो निर्दोष आहे) तर त्या महिलेला देखील दंड देण्यास आम्हाला मदत करा.. हे अमानुष, लज्जास्पद आणि हृदयद्रावक आहे.. कृपया मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकतो हे मला कळवा’ या आशयाचे ट्वीट केले आहे. सध्या तिचे हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय आहे प्रकरण?

बंगळुरुमधील कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचे सांगत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून नाकातून रक्त वाहताना दिसत होते. मारहाणीमुळेच आपली ही परिस्थिती झाली असल्याचं हितेशाने सांगितलं आहे. “माझी झोमॅटो डिलिव्हरी ऑर्डर उशिरा आली आणि मी कस्टमर केअरसोबत बोलत होते, यादरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं. त्याने मला मारहाण केली आणि इथे रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला,” असं हितेशाने सांगितले होते.

त्यानंतर डिलिव्हरी बॉय कामराजने यावर स्पष्टीकरण देते म्हटले की ‘मी उशिरा ऑर्डर घेऊन महिलेच्या घरी पोहोचल्याने तिने ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. तिला ती ऑर्डन पैसे न देता घ्यायची होती. तिने मला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी स्वत:ला वाचवण्यासाठी तेथून पळून आलो. त्या महिलेच्या हातात असणारी अंगठी तिच्या नाकाला लागली आणि रक्त येऊ लागले.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:52 pm

Web Title: pareeniti chopra tweet on zomato matter avb 95
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील ‘सुंदरलाल’ला झाला करोना
2 ‘गलीबॉय’लाही करोनाची लागण
3 Birthday Special: स्वत: रिक्षावर पोस्टर चिटकवून आमिरने केले होते पहिल्या चित्रपटाचे प्रमोशन
Just Now!
X