24 February 2021

News Flash

Meri Pyaari Bindu trailer chapter 2 : आयुषमान म्हणतो, बिंदू ‘जुगाड’ करण्यात ‘एक्स्पर्ट’

'जिंदगी पिघलती हुई आइस्क्रिम की तरह है, टेस्ट नहीं किया तो वेस्ट हो जाएगी!

यशराज फिल्म्सच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातून आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांनी एक अनोखी शक्कल लढविल्याचे दिसते. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यासाठी ‘मेरी प्यारी बिंदू’ च्या पोस्टरनंतर याचा ट्रेलर दोन भागांत प्रदर्शित करुन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा निर्मात्यांनी प्रयत्न केल्याचे दिसते. सोमवारी या चित्रपटाच्या ट्रेलरचा ‘चॅप्टर १’ प्रदर्शित झाल्यानंतर आज ‘चॅप्टर २’ प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दमदार आगमनासाठी सज्ज झालेली परिणीती ट्रेलरमध्ये धम्माल करताना दिसते. तरुणाईतील जल्लोष काय असतो? हेच या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘जिंदगी पिघलती हुई आइस्क्रिम की तरह है, टेस्ट नहीं किया तो वेस्ट हो जाएगी!, हे मला बिंदूने शिकवले, असे सांगून अभिनेता आयुषमान खुरानाने या चित्रपटात परिणीतीची हवा दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच, बिंदूकडे प्रत्येक गोष्टीचा जुगाड करण्याची क्षमता असल्याचे सांगत तो यात परिणीतीच्या बिनधास्त स्वभावाची प्रशंसा करतानाही दिसतो.

यशराज फिल्म्सच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ट्रेलरमधील अभिमन्यू आणि बिंदूच्या कहाणीचा पहिला भाग पाहिल्यानंतर त्यांच्या पुढच्या भागाचीच सर्वांना उत्सुकता लागली असेल यात शंका नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेले हे दोन्ही कलाकार येत्या १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामधून परिणीती गायन क्षेत्रातही पदार्पण करते आहे. बहिण प्रियांकाप्रमाणेच आता ती अभिनयासोबत गायिकाही झाली आहे. या चित्रपटासाठी तिने ‘माना के हम यार नही..’ हे गाणे गायले आहे. तिच्या या गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 4:27 pm

Web Title: parineeti chopra ayushmann khurrana meri pyaari bindu trailer chapter 2 released watch video
Next Stories
1 राखी सावंतच्या अटकेचे वृत्त पंजाब पोलिसांनी फेटाळले
2 ‘भल्लालदेव’च्या क्रोधाग्नीचा दाह..
3 रजनीकांतचा ‘रोबोट २.०’ हा ‘मेक इन इंडिया’ सिनेमा
Just Now!
X