26 January 2021

News Flash

‘तिचा भूतकाळच तिचे भविष्य वाचवू शकतो’, परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित

सध्या हा टीझर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गेल्या वर्षी परिणीतीच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. तेव्हा पाहून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या २० सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा अभिनय पाहण्यासारखा आहे.

आणखी वाचा- अनुप जलोटा यांचा ‘सत्य साईबाबा’ चित्रपटातील लूक व्हायरल

यापूर्वी ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट ८ मे २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीच्या भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. टीझर प्रदर्शित होताच परिणीतीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाष तिवारी देखील भूमिका साकारणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 2:14 pm

Web Title: parineeti chopra movie the girl on the train teaser out avb 95
Next Stories
1 बिकिनी न घातल्यामुळे करिअला लागली उतरती कळा; अभिनेत्रीनं सांगितली आपबिती
2 “मला तिथे गुदमरल्यासारखं वाटतं”; जेव्हा इम्रान खानने केलं होतं बॉलिवूड पार्ट्यांबद्दल वक्तव्य
3 मी जिंकणारंच! अभिनेत्रीनं लावली कारसोबत शर्यत; पाहा हा थक्क करणारा व्हिडीओ
Just Now!
X