News Flash

अभिनेत्रीने सैफवर प्रेम असल्याचा केला होता खुलासा, करीनाला कळताच…

तिने एका शोमध्ये खुलासा केला होता...

बॉलिवूडमध्ये लव्ह, अफेअरच्या चर्चा या कायम सुरु असतात. बऱ्याचवेळा कलाकार डिनर डेट किंवा फिरताना दिसतात. बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीचे सैफ अली खानवर प्रेम दडले होते. तिने स्वत: एका कार्यक्रमात खुलासा केला होता. याबाबत सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खानला देखील माहिती आहे असे तिने म्हटले होते.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून परिणीती चोप्रा आहे. आज परिणीतीचा वाढदिवस आहे. आज आपण तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. एकदा परिणीतीने कपिल शर्मा शोमध्ये सैफ अली खानवर प्रेम असल्याचे सांगितले होते.

परिणीतीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या चित्रपटाशी संबंधीत कपिलने परिणीतीला प्रश्न विचारला होता. जर खऱ्या खुऱ्या आयुष्यात संधी मिळाली तर तु कोणत्या अभिनेत्यासोबत तुझी जबरिया जोडी बनवशील असे कपिल म्हणाला होता. त्यावर परिणीतीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

जर संधी मिळाली तर मी सैफ अली खानला किडनॅप करुन त्याच्यासोबत जबरीया जोडी बनवेन असे म्हटले होते. पुढे तिने मला सैफ अली खान आवडतो आणि करीनाला देखील ही गोष्ट सांगितली आहे असे म्हटले. मला सैफ आवडतो हे करीनाला कळाले तेव्हा तिला याबाबत कोणतीही समस्या नव्हती असे तिने म्हटल्याचे परिणीती पुढे सांगितले होते.

लवकरच परिणीती अर्जुन कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. लॉकडाउनमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. या व्यतिरिक्त तिचा ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 1:42 pm

Web Title: parineeti chopra said she loves saif ali khan a lot has already informed kareena kapoor avb 95
Next Stories
1 ‘घरात १० दिवस बंद राहून पाहा मग कळेल’; ‘बिग बॉस’ स्पर्धक ट्रोलर्सवर संतापली
2 Video : अभिनेता महेश कोठारेंची ‘धडाकेबाज’ मुलाखत
3 या प्रसिद्ध अभिनेत्रीला करोनाची लागण; शोमधील कलाकारही झाले होम क्वारंटाइन
Just Now!
X