News Flash

‘माझी डुप्लिकेट पाहा’; सायनाने शेअर केला बायोपिकमधील परिणीतीचा फर्स्ट लूक

अभिनेत्री दिसतेय हुबेहुब सायनासारखी; बायोपिकमधील फर्स्ट लूक होतोय व्हायरल...

भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

नुकतेच सायनाने या चित्रपटात परिणीती कशी दिसेल? याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये परिणीती हुबेहुब सायनासारखी दिसत आहे. माझी डुप्लिकेट पाहा असं म्हणत सायनाने ट्विट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सायना नेहवालचे चाहते हा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

सायना हा चित्रपट खरं तर गेल्या वर्षीपासून चर्चेत आहे. या चित्रपटात सुरुवातील श्रद्धा कपूर झळकणार होती. तिने बॅटमिंटनच्या सरावास सुरुवात देखील केली होती. पण ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे श्रद्धाने अखेर सायनाच्या बायोपिकवर पाणी सोडलं म्हटलं जातं आहे. त्यानंतर परिणीतीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. सध्या कलाविश्वामध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या आगामी बायोपिकविषयी उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 5:04 pm

Web Title: parineeti chopra saina nehwal biopic first look mppg 94
Next Stories
1 ‘विजयने अचानक तिचा हात ओढला आणि…’, काय घडलं त्या दिवशी क्रू मेंबरने केला खुलासा
2 Video : रितेश-जेनेलियाचं दिवाळी गिफ्ट, ‘आशेची रोषणाई’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र
3 ‘प्रियकर असेल तर श्रीमंतच हवा’; रिलेशनशिपबद्दल अभिनेत्रीचं वक्तव्य
Just Now!
X