News Flash

…म्हणून परिणीतीने आदित्यला मारला टोमणा

म्हणून परिणीतीला राग अनावर झाला

आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्रा

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये येणारे पाहुणे असे काही बोलून जातात की नंतर त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु असते. पुढच्या रविवारी कॉफी विथ करणमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर येणार आहेत. पुढील शोचे प्रोमो टीव्हीवर आलाही. हा प्रोमो पाहिल्यावर कोणीही बोलणार नाही की ते दोघे फार चांगले मित्र आहेत. संपूर्ण प्रोमोमध्ये ते एकमेकांना टोमणेच मारताना दिसत आहेत.

रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यानंतर आता ‘कॉफी विथ करण’मध्ये पुढच्या आठवड्यात ही जोडी दिसणार आहे. ‘दावत- ए- इश्क’ या सिनेमातून हे दोघे एकत्र आले होते. एकीकडे आदित्य फार कमी बोलतो तर दुसरीकडे परिणीती खूप बोलते. करणने आदित्यला एक प्रश्न विचारला की, कोणती अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी किस करताना किंवा इंटिमेट होताना दिसू शकेल? या प्रश्नाचे उत्तर देताना आदित्यने परिणीतीचेच नाव घेतले.

आदित्यचे हे उत्तर ऐकून परिणीतीला फार आश्चर्य वाटले आणि तिने सांगितले की, आदित्यने स्वतःच्या मेंदूचा वापर केला पाहिजे. पण त्याच्याकडे मेंदूच नाहीये. यामुळे आपण त्याचा मेंदू एका चमच्यात गोळा करुन त्याला देऊ. यानंतर परिणीती हेही म्हणाली की, तिने तिच्याबद्दल आतापर्यंत सगळ्यात विनोदी गोष्ट ऐकली ती म्हणजे, ती एका हॉट एअर बलूनसारखी दिसते.

परिणीतीने ही गोष्ट मान्यही केली की ती पूर्वी अशीच दिसायची. करण जोहरच्या या शोमध्ये एकमेकांना टोमणा मारणे हे गेल्या चार पर्वांपासून सुरुच आहे. कोणते कलाकार किती आश्चर्यकारक विधान करतात हेच या पर्वात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 7:25 pm

Web Title: parineeti chopra says adity roy kapoor to use his brean in koffee with karan
Next Stories
1 Yuvraj and Hazel Keech Wedding: युवीने शेअर केला लग्नसोहळ्यातील पहिला फोटो
2 ‘भय’च्या संगीताला बॉलिवूडचा साज!
3 सलमानसोबत करिश्मा करणार रुपेरी पडद्यावर पुनरागमन?
Just Now!
X