07 March 2021

News Flash

‘गोलमाल अगेन’च्या सेटवर परी-जॉनीची धमाल मस्ती

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल' सिनेमाचा हा चौथा भाग आहे

परिणीती चोप्रा आणि जॉनी लिव्हर

आयुषमानची बिंदू अर्था परिणीती चोप्रा सध्या ‘गोलमाल अगेन’च्या शूटमध्ये व्यग्र आहे. तिने नुकताच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन कॉमेडीचा किंग जॉनी लिव्हरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये परी आणि जॉनी चेहऱ्याचे वेगवेगळे हावभाव करताना दिसत आहेत. या व्हिडिओला ‘जॉनी लिव्हरसोबत शॉट्सच्या मधली मजा’ असे कॅप्शन तिने लिहिलं. या ट्विटला आतापर्यंत ३७४ लोकांनी रीट्विट केलंय तर ४ हजारहून अधिक लोकांनी हे ट्विट लाइक केलंय. सिनेमात परिणीती आणि जॉनी काय धम्माल करतात हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल’ सिनेमाचा हा चौथा भाग आहे.

परिणीतीचा आगामी सिनेमा ‘मेरी प्यारी बिंदू’च्या प्रमोशनसाठी परिणीतीने तिच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून बिंदू ठेवलेय. या सिनेमातून परिणीतीने गायनाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना परिणीती सांगते, ”मेरी प्यारी बिंदू’चा संपूर्ण प्रवास खूप चांगला होता. या सिनेमानंतर गोलमाल अगेन करतेय. माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठीही हा एक चांगला बदल असेल. मला एकाच पद्धतीच्या भूमिका करायच्या नाहीयेत. प्रत्येक वेळा वेगळं काही शिकण्याकडे माझी ओढ असते. रोहित शेट्टीसोबत काम करण्याची संधी मिळाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तो खूप मोठा दिग्दर्शक आहे.’

रोहितने ‘गोलमालः फन अनलिमिटेड’ हा सिनेमा २००६ मध्ये केला होता. त्यानंतर २००८ मध्ये ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि २०१० मध्ये ‘गोलमाल ३’ हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. हे तीनही सिनेमे प्रेक्षकांना पसंत पडले होते. त्यामुळे आता ‘गोलमाल अगेन’ प्रेक्षकांना खूश करायला यशस्वी ठरतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 4:09 pm

Web Title: parineeti chopra shares video with johny lever from golmaal again set
Next Stories
1 आंद्रे रसेलला वेध बॉलिवूडचे
2 विराटला अनुष्का नाही तर ही अभिनेत्री वाटते ‘क्यूट’
3 कटप्पामुळे या राज्यात ‘बाहुबली २’ ला तीव्र विरोध, सिनेमा प्रदर्शित न करु देण्याची धमकी
Just Now!
X