News Flash

परिणीतीला गाण्यात करिअर करण्याचा आयुषमानचा सल्ला

'परिणीती चोप्रा ही उत्तम गायक आहे'

परिणीती चोप्रा ही उत्तम गायक असून आणि तिच्या आवाजात जादू आहे, त्यामुळे तिने  या कलेचा गांभिर्याने विचार करायला हवा असा सल्ला अभिनेता आयुषमान खुराना याने तिला दिला आहे. आयुषमान स्वत: उत्तम पार्श्वगायक आहे. त्याने अनेक चित्रपटांत गाणी देखील गायली आहेत, इतकेच नाही तर अभिनयापेक्षा त्याचा आवाजाला प्रेक्षकांनी अधिक दाद दिली आहे. या अभिनेत्याने परिणीतीची स्तुती करताना तिच्या गायनाचे कौतुक केले आहे. परिणीतीचा आवाज हा फारच सुंदर असून तिने याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे इतकेच नाही तर अभियापेक्षा तिने गाण्यात करिअर घडवले पाहिजे असा सल्ला त्याने दिला आहे.
आयुषमान आणि परिणीती ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या सुरू आहे. या चित्रिकरणाच्या वेळीस आपल्याला परिणीतीकडे असलेल्या या नव्या कलेबद्दल माहिती झाले असेही तो म्हणाला. परिणीती आणि आपली गाण्यातली आवड एकसारखी आहे. त्यामुळे सेटवरचा फावला वेळ  हा गाणे गुणगुण्यात जातो असेही तो म्हणाला. तसेच परिणीती सोबत लवकरच गाणे गाण्याची इच्छा देखील त्याने बोलून दाखवली. आयुषमान याने केलेल्या स्तुतीमुळे परिणीतीदेखील खुश झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 7:23 pm

Web Title: parineeti chopra should take her singing seriously ayushmann khurrana
Next Stories
1 ‘पिपली लाइव्ह’च्या सह-दिग्दर्शकाला सात वर्षांची शिक्षा
2 अभिनेत्री नेहा शर्माच्या ट्विटरवरून अश्लील फोटो प्रसिद्ध, हॅक केले होते अकाउंट
3 ..आणि आईच्या साथीने धावला मिलिंद सोमण
Just Now!
X