21 September 2018

News Flash

चित्रपटाचं प्रमोशन करणं परिणितीला पडलं महागात

परिणिती लवकरच अभिनेता अर्जुन कपूरबरोबर 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

परिणिती चोप्रा

‘इश्कजादे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री परिणिती चोप्रा तिच्या अभिनयामुळे कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असते. सतत सोशल मीडियावर वावरणारी ही अभिनेत्री चाहत्यांच्या घोळक्यात असल्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. मात्र यावेळी ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली असून ती ट्रोल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

HOT DEALS
  • Moto Z2 Play 64 GB (Lunar Grey)
    ₹ 14640 MRP ₹ 29499 -50%
    ₹2300 Cashback
  • jivi energy E12 8GB (black)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%
    ₹280 Cashback

परिणिती लवकरच अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान परिणितीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे आणि तिच्या नव्या हेअर कलरमुळे ती ट्रोल झाली आहे.


परिणितीने परिधान केलेला ड्रेस ती सूट होत नसल्याचं मत अनेक नेटकऱ्यांनी मांडलं आहे. इतकंच नाही तर काही जणांची तिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफबरोबरही केली आहे. ‘फितूर’ चित्रपटामध्ये कतरिनाचा जसा लूक होता तसाच लूक परिणितीने केल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र या टिकेवर परिणितीने अद्यापही कोणतंच प्रत्युत्तर दिलेलं नाही.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत. त्यामुळे परिणितीच्या या ट्रोलिंगचं प्रकरण काही नवीन नाही. काही दिवसापूर्वी अभिनेत्री अमिषा पटेलही तिच्या हॉट फोटोशूटमुळे ट्रोल झाली होती.

 

First Published on August 31, 2018 10:48 am

Web Title: parineeti chopra troll again for her red hairstyle tmov