X
X

Photo : परिणीतीचा बाथटबमधील फोटो होतोय व्हायरल, कारण…

READ IN APP

सध्या सोशल मीडियावर या फोटोची चर्चा आहे

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटचा लवकरच हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटातील परिणीताचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये परिणीती पहिल्यांदाच वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये परिणीती एक बाथटबमध्ये बसली असून तिच्या कपाळावर मोठी जखम आहे आणि या जखमेतून रक्त वाहत असल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच ती एखादं काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवत आहे.

‘द गर्ल ऑन द ट्रेन’च्या रिमेकमध्ये परिणीती एका घटस्फोटीत महिलेची भूमिका साकारत असून एका बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या शोध ती या चित्रपटामध्ये घेणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण सुरु करण्यात आलं आहे. चित्रपटामध्ये परिणीतीव्यतिरिक्त आदिती राव हैदरी, किर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी स्क्रीन शेअर करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टरटेमेंटअंतर्गत करण्यात येणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.

दरम्यान, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामध्ये ही भूमिका एमिली ब्लंटने साकारली होती. हा हॉलिवूड चित्रपट पॉला हॉकिन्स यांनी २०१५ रोजी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे.

22
X