News Flash

अखेर पॅरिस हल्ल्यावर बोलली मल्लिका शेरावत

हल्लेखोरांनी अश्रू धुरांचा वापर करुन दोघांना मारहाण केली होती

Mallika Sherawat : मल्लिकाच्या 'मर्डर', 'ख्वाहिश', 'प्यार के साइड इफेक्टस' या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतवर काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये हल्ला झाला होता. या हल्ल्याच्यावेळी तिचा प्रियकर सायरिल ऑक्जेनफेंसही तिच्यासोबत होता. हल्लेखोरांनी अश्रू धुरांचा वापर करुन दोघांची मारहाण केली. मल्लिकाच्या मते, ती एक सक्षम महिला आहे, यामुळे तिला खाली पाडण्यासाठी त्यांना तीनपेक्षा अधिक हल्लेखोरांची मदत घ्यावी लागली.

मल्लिकाने तिथल्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेचे सविस्तर वृत्त सांगितले. यासोबतच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोला मेसेज लिहिताना तिने म्हटले की, मला खाली पाडण्यासाठी जवळपास ३ पुरुषांना प्रयत्न करावे लागले होते. मी एक सशक्त महिला आहे. मल्लिका आपल्या आरोग्याची फार काळजी घेते. ती शुद्ध शाकाहारी असून दररोज योगा करते.

पॅरिसमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोर चोरीच्या इराद्याने मलिकाच्या अपार्टमेंटमध्ये घुसले होते. शुक्रवारी घडलेल्या या भयानक प्रकाराची मल्लिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांत तक्रार दाखल करुनही अद्याप हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ज्या ठिकाणी मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला करण्यात आला त्याच ठिकाणी मागील महिन्यात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार किम कार्दाशियनवर हल्ला करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 5:46 pm

Web Title: paris attack it takes more than 3 masked men to take me down says mallika sherawat
Next Stories
1 आर्किटेक्ट बनण्याचे स्वप्न पाहणऱ्या ऐश्वर्याने अशा प्रकारे ठेवले ग्लॅमर जगतात पाऊल..
2 रणबीर-कतरिनाच्या मध्ये येणारा ‘तो’ तिसरा शाहरुख तर नाही ना?
3 घटस्फोटासाठी अरबाज- मलायकाने गाठले न्यायालय