समीक्षकांच्या व प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या’ ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ कंपनीच्या ‘परतु’ या मराठी सिनेमाची पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच पिफच्या स्पर्धा विभागात पहिल्या सात चित्रपटात या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे. १४ ते २१ जानेवारी  दरम्यान हा महोत्सव पुण्यात संपन्न होणार आहे.
सत्यकथेवर आधारित आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या ‘परतु’ या सिनेमात किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
याआधीही देश-विदेशांतल्या प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी ‘परतु’ चित्रपटाचं जोरदार स्वागत केलं असल्याचं सांगत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘परतु’ची झालेली निवड ही निश्चितच आनंददायी असल्याचं दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी सांगितलं. निर्माते नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन यांनीही ‘परतु’ चित्रपटाच्या पिफमध्ये झालेल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.