15 August 2020

News Flash

“..म्हणून मला ‘मुझे सेक्स बहुत पसंद है’ हा डायलॉग बोलताना विचित्र वाटलं नाही”

चित्रपटाच्या ट्रेलरमधील डालयॉगबद्दल अभिनेत्रीचे स्पष्टीकरण

भूमि पेडणेकर

शुक्रवारी बॉलिवूडमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या तिकीटबारीवर हा चित्रपट तुफान कामगिरी करत आहे. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘पानिपत’ या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत ‘पती पत्नी और वो’ने मागे टाकले आहे. ‘पती पत्नी और वो’ने पहिल्या तीन दिवसांमध्ये एकंदरीत ३५.९४ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर पानिपतने पहिल्या तीन दिवसांमध्ये एकूण १७.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पती पत्नी और वो’च्या माध्यमातून कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु असली तरी हे तिघेही प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत. अशाच एका प्रमोशनच्या कार्यक्रमामध्ये भूमि पेडणेकरला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आलं.

झालं असं की एका प्रमोशनल इव्हेंट दरम्यान भूमिला चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका संवादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. चित्रपटामध्ये कार्तिकच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या भूमिच्या तोंडी ट्रेलरमध्ये एक बोल्ड संवाद दाखवण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरवातीलाच कार्तिक लग्नासाठी मुलगी बघायला जातो तेव्हा तो “तुझे छंद काय आहेत?,” असा प्रश्न भूमिला विचारतो. त्यावर भूमि “मुझे सेक्स बहुत पसंद है,” असं उत्तर देते. याच सीनवरुन भूमिला “तुला हा डायलॉग म्हणताना विचित्र वाटलं नाही का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना भूमिने, नाही असं उत्तर दिलं. “हा डायलॉग बोलताना मला विचित्र वाटलं नाही. कारण हा डायलॉग आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीच्या तोंडी दाखवण्यात आल्याने त्यामध्ये विचित्र वाटण्यासारखं काही नव्हतं,” असं भूमि म्हणाली.

पती पत्नी और वो’च्या निमित्ताने कार्तिक, अनन्या आणि भूमि हे त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र आलं आहे. तिकीटबारीवरील कामगिरी पाहता हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता का चित्रपट शंभर कोटींच्या घरात कमाई करतो का याकडे व्यापार विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 3:44 pm

Web Title: pati patni aur woh bhumi pednekar reacted when asked if she felt awkward to say mujhe sex bahut pasand hai in the film scsg 91
Next Stories
1 आर्चीचा नवा ‘मेकअप’: पहिली झलक पाहिली आहे का?
2 सलमान-कतरिना पुन्हा एकत्र, घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट
3 मराठीतील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यावर आली फुलं विकण्याची वेळ
Just Now!
X