05 June 2020

News Flash

‘फास्ट अँड फ्युरियस’चा नायक पुन्हा एकदा चर्चेत; मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पॉलच्या मुलीने पोस्ट केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल

‘फास्ट अँड फ्युरियस’ फेम अभिनेता पॉल वॉकर हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. २०१३ साली त्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. मात्र त्याचा एक व्हिडीओ आज पुन्हा एकदा चर्चेत आहे. पॉलची मुलगी मिडो वॉकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे पॉलच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळाला आहे.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये?

चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना सेटवर अचानक पॉलची मुगली आली. आपल्या मुलीला पाहून तो प्रचंड खुश झाला. त्याने तिला आनंदाने मिठी मारली. खरं तर या व्हिडीओमध्ये एवढेच चित्रण आहे. मात्र पॉलच्या आयुष्यातील हा शेवटचा व्हिडीओ ठरला. त्यामुळे या चित्रणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. “मला वाटलं नव्हतं की हा व्हिडीओ मी कधी पोस्ट करु शकेल. बाबा माझं तुमच्यावर खुप प्रेम आहे. जिथे आहात तिथे आनंदी राहा.” अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओवर पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

I never thought I’d share this. But it felt right. Be good. I love you. Stay safe. xx

A post shared by Meadow Walker (@meadowwalker) on

अफाट वेग आणि त्या वेगाच्या साहाय्याने कार रेसिंगमधील काळे विश्व उलगडणारा ‘फास्ट अँड फ्युरियस’ या मालिकेतील प्रत्येक चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो. या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पॉल वॉकरने तर जगभरातील तरुण-तरुणींना वेड लावले. मात्र चित्रपटांमध्ये वेगाने कार चालवणाऱ्या या अभिनेत्याचा मृत्यूही झाला एका कार अपघातात. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया भागात शनिवारी रात्री एका कार्यक्रमातून परतताना वॉकरच्या कारने रस्त्यावरच पेट घेतला आणि त्यात त्याचा मित्रासह मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 4:33 pm

Web Title: paul walkers daughter meadow walker shares an unseen video mppg 94
Next Stories
1 Video : क्वारंटाइनमध्ये तारक मेहता…मधला अय्यर काय करतोय पाहा
2 मुलांच्या आत्महत्या वाढू लागल्याने शक्तिमान मालिका झाली होती बंद? मुकेश खन्ना यांनी सांगितलं खरं कारण
3 आयुषमानच्या मराठी ट्विटवर मुंबई पोलिसांचे फिल्मी उत्तर; म्हणाले..
Just Now!
X