अभिनेत्री पवित्रा पुनिया ‘बिग बॉस’ सिझन १४ च्या माध्यमातून बरीच लोकप्रिय झाली. एजाज खानसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चांनंतर तिची लोकप्रियता अजूनच वाढताना दिसत आहे. वाढत्या लोकप्रियतेसोबतच तिच्याबरोबर होणारं ट्रोलिंगही वाढताना दिसत आहे. पवित्राने ट्रोलर्सला चांगलंच खडसावलं आहे.

पवित्रा पुनियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चांगलीच भडकलेली दिसत आहे. ती म्हणते की, तिला काय कोणाच्या शिव्या खाण्याची हौस नाही. ती म्हणते,” कोणाच्या आयुष्यात काय चाललंय, कोणाला काय त्रास आहे, यामुळे लोकांना काय त्रास आहे? काहीही फरक पडत नाही. पण तरीही यायचं आणि शिव्या द्यायला सुरुवात करायची. म्हणजे आम्ही काय फक्त तुमच्या शिव्या खायला बसलोय का?”

पवित्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पवित्राचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते चांगलेच खूश झालेले दिसत आहेत. ते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. पवित्राचा हा तडफदार अंदाज सर्वांनाच फार आवडला आहे.

पवित्रा अभिनेता एजाज खानसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ‘बिग बॉस’ या शोमध्ये हे दोघे एकत्र होते. तिथेच ते प्रेमात पडले. हे दोघेही सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.