25 October 2020

News Flash

“पवित्राच्या नादाला लागू नकोस तुझं करिअर संपेल”; एक्स बॉयफ्रेंडचा अभिनेत्याला सल्ला

बिग बॉस १४; अभिनेत्रीच्या गेम प्लानवर एक्स बॉयफ्रेंड संतापला

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पवित्रा पुनिया आणि एजाज खान या दोघांमध्ये एक वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यांच्या या बहरणाऱ्या नात्यावर पवित्राचा एक्स बॉयफ्रेंड पारस छाब्रा याने प्रतिक्रिया दिली. मित्रा या बाईच्या नादाला लागू नकोस तुझं करिअर संपेल असा सल्ला त्याने एजाजला दिला आहे.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

पारस आणि पवित्रा जवळपास तीन वर्ष एकमेंकांना डेट करत होते. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. दरम्यान आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत पारसने पवित्रावर जोरदार टीका केली. तो म्हणाला, “पवित्रा ही एक अविश्वासू व्यक्ती आहे. स्वत:च्या फायद्यासाठी खोटं बोलण्यात ती पटाईत आहे. खरं तर तिचं नाव अवित्र असं ठेवायला पाहिजे होतं. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती आणखी एका तरुणाला डेट करत होती हे सत्य मला या शोमधूनच कळालं. तिचं लग्न झालं होतं हे देखील तिने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. मित्रा एजाज तू एक यशस्वी अभिनेता आहेस. या बाईच्या नादाला लागू नकोस. तुझं करिअर धोक्यात येईल.”

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

पवित्रा ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बालवीर, नागिन, ये है मोहब्बतें, लव्ह यु जिंदगी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. स्प्लिट्सविला या शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. अभिनयासोबतच ती मादक फोटो, व्हिडीओज आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 4:39 pm

Web Title: pavitra punia paras chhabra bigg boss 14 eijaz khan mppg 94
Next Stories
1 “माझ्या खात्यात भरपूर पैसे आहेत काळजी नसावी”; आदित्य नारायणचं ट्रोलर्सना प्रत्युत्तर
2 ड्रग्ज प्रकरणात विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राइम ब्रांचची नोटीस
3 नव्या चित्रपटाची घोषणा करत कंगनाने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा, म्हणाली…
Just Now!
X