सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल किंवा तिचा ट्रेण्ड होईल याचा काहीच अंदाज नसतो. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे पावरी हो रही हैं हा एकच ट्रेण्ड व्हायरल होताना दिसत आहे. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यावर व्हिडीओ करत ते शेअरदेखील केले आहेत. विशेष म्हणजे आता या पावरीचा नाद अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि शुभांगी गोखले यांनादेखील लागल्याचं पाहायला मिळत आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या सेटवर शाल्व आणि शुभांगी गोखले यांनी एक भन्नाट व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ शुभांगी गोखले यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
‘ये मैं हूँ, ये शुभांगी जी है और यहाँ पे कोई पावरी नहीं हो रही हैं’, असं म्हणत शाल्वने हा व्हिडीओ शूट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधील या दोन्ही कलाकारांचे एक्सप्रेशन्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
नेमकं काय आहे हे पावरी प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर ‘pawari ho rahi hai’ असं म्हणणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवर अनेक मीम्स सुद्धा व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानची कॉन्टेंट क्रिएटर Dananeer दिसत असून तिने हा व्हिडीओ ६ फेब्रुवारी रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत ती ‘ ये मैं हूँ, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिची पार्टीला पावरी म्हणण्याची स्टाइल अनेकांना आवडली असून हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 12:28 pm