22 October 2020

News Flash

अनुरागच्या वर्तनाविषयी इरफान पठाणला सांगितलं होतं, पायलचा आणखी एक खुलासा

अनुराग कश्यप प्रकरणात पायल घोषने घेतलं इरफान पठाणचं नाव, म्हणाली...

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे अभिनेत्री पायल घोष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी ती सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसून आली. त्यातच आता तिने या प्रकरणी माजी क्रिकेटपटू इरफान खान याच्या नावाचा उल्लेख केला आहे. अनुरागच्या वर्तनाविषयी मी इरफान पठाणला सांगितलं होतं, असं वक्तव्य पायलने केलं आहे.

गेल्या काही दिवसापासून पायल सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यामध्येच तिने अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पायलने माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच्या नावाचा उल्लेख केला आहे.


“अनुरागने माझ्यावर बलात्कार केला असं काही मी इरफान पठाणला सांगितलं नव्हतं. मात्र, अनुरागचं वर्तन कसं आहे. त्याचं वागणं कसं आहे याविषयी मी इरफानला सांगितलं होतं. त्याला सगळं माहित आहे. मात्र, आता तो काहीच बोलत नाहीये आणि माझा चांगला मित्र असल्याचा दाव करतोय”, असं ट्विट पायलने केलं आहे. पुढे तिने आणखीन एक ट्विट केलं आहे.


“इरफान पठाणला टॅग केलं याचा अर्थ असा नाही की मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. मात्र, त्याच्यासोबत मी काही गोष्टी शेअर केल्या होत्या. पण बलात्काराविषयी नाही. मला खात्री आहे, मी त्याला जे काही सांगितलं होतं ते तो नक्कीच सांगेल,”असंही ती म्हणाली.

दरम्यान, पायलने इरफानविषयी ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर एकाच चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी तिच्या ट्विटवर कमेंट्स केल्या आहे. मात्र, अद्यापही इरफान पठाणने यावर मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 10:55 am

Web Title: payal ghosh anurag kashyap controversy actress talked to irfan pathan ssj 93
Next Stories
1 ‘धर्मांधता व अज्ञान कायमच सोबत राहतात’; शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी जिशान अय्यूबनं व्यक्त केली खंत
2 नऊवारी साडी अन् दागिण्यांचा थाट; पाहा अंकिता लोखंडेचं ‘नवरात्री स्पेशल’ फोटोशूट
3 स्वप्नील जोशीचा पहिला चित्रपट कोणता माहित आहे का?
Just Now!
X