बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावर बंगाली अभिनेत्री रुपा दत्ता हिने प्रतिक्रिया दिली आहे. पायलने केलेले आरोप खरे आहेत. अनुरागला कठोर शिक्षा व्हायलाच हवी असं म्हणत तिने पायल घोषला पाठिंबा दिला आहे.

अवश्य पाहा – पतीला घटस्फोट देऊन ही अभिनेत्री राहतेय बॉबी देओलच्या घरात

अवश्य पाहा – “तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य ड्रग्जमध्ये”; अभिनेत्याने उडवली दीपिकाची खिल्ली

रुपा दत्ताने ट्विटरच्या माध्यमातून अनुरागवर जोरदार टीका केली. “अनुराग कश्यप महिलांचा आदर करत नाही. पायल घोषने केलेले आरोप खरे आहेत. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. तो ड्रग्जचं सेवन देखील करतो. शिवाय आपल्या सहकलाकारांना ड्रग्ज पुरवतो. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची चौकशी करावी.” अशा आशयाचं ट्विट करुन तिने अनुरागवर निशाणा साधला. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.