News Flash

“इथे वाटीभर पाण्यात डुंबणाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू येतो”; पायल घोषने उडवली बॉलिवूडची खिल्ली

बॉलिवूड कलाकारांना पायल घोषचा उपरोधिक टोला

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनुरागवर आरोप करताना तिने रिचा चड्ढा, हुमा खुरेशी, माही गिल यांसारख्या काही अभिनेत्रींची देखील नावं घेतली होती. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. सातत्याने होणाऱ्या या टीकेला प्रत्युत्तर देताना पायल घोषने बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे. इथे वाटीभर पण्यात डुंबून मरणाऱ्या कलाकारांना नैसर्गिक मृत्यू येतो, असं चकित करणारा विधान तिने केलं आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स

नेमकं काय म्हणाली पायल घोष?

बॉलिवूड कलाकार वाटीभर पाण्यात डुंबून मरतात आणि मग त्यांच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू म्हणून घोषित केलं जातं. ना बीवी ना बच्चा ना बाप बड़ा ना मैया, द होल थिंग इस दॅट के भैया सबसे बड़ा रुपैया (या लोकांसाठी केवळ पैसाच महत्वाचा आहे.) अशा आशयाचं ट्विट करुन पायल घोषने बॉलिवूडची खिल्ली उडवली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:59 pm

Web Title: payal ghosh joke on bollywood mppg 94
Next Stories
1 “अवॉर्ड शो फक्त पैसे कमावण्यासाठी असतात”, सैफ अली खानचे वक्तव्य
2 ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी सेलिब्रिटीही पुढे सरसावले
3 मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय तापसी पन्नू, शेअर केला स्विमिंग सूटमधला फोटो
Just Now!
X