News Flash

पायल घोषला करोना?; RPI प्रवेशादरम्यान आठवलेंच्या संपर्कात आल्याने क्वारंटाइन

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची बाधा

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषने अलिकडेच रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षात प्रवेश केला. तीन दिवसांपूर्वी एका लहानशा कार्यक्रमात आरपीआय झेंडा हाती घेत पायलने पक्षात सामिल झाल्याचं जाहिर केलं. या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी रामदास आठवले यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं. परिणामी आठवलेंच्या संपर्कात आल्यामुळे आता पायलला देखील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. शिवाय तिची देखील करोना चाचणी घेण्यात आली आहे. पायलने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

अनुराग कश्यपविरोधात पायल घोषने पोलिसात धाव घेतली होती. मात्र पोलीस चौकशी न झाल्याने तिने आपले म्हणणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे मांडले होते. त्यावेळी आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी तिला पाठिंबा दिला होता.

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायल घोषचा आरपीआयमध्ये पक्षप्रवेश झाला. पायल घोष, कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकुर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. या पत्रकार परिषदेत सामिल झालेल्या सर्व लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या करोना चाचण्यादेखील घेण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:22 pm

Web Title: payal ghosh ramdas athawale coronavirus test positive mppg 94
Next Stories
1 करोना पॉझिटिव्ह स्मृती इराणी यांच्या ट्विटवर सोनू सूदची प्रतिक्रिया, म्हणाला…
2 सिग्नलवर चोराने लंपास केली बॅग, अभिनेत्रीने ट्विटरद्वारे पोलिसांकडे मागितली मदत
3 मौनी रॉयने केला साखरपुडा? वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Just Now!
X