30 September 2020

News Flash

प्रियंका गांधींच्या वादात सनी लिओनीला आणलं; पायल रोहतगीवर भडकले नेटिझन्स

'प्रियंका गांधींसोबत पॉर्न स्टार सनी लिओनीलाही उभं करा'

प्रियंका गांधी यांना काँग्रेसने अखेर मैदानात उतरवलं असून नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांनी प्रियंका गांधी यांचं स्वागत केलं असून काहींनी मात्र यावर टीका केली आहे. प्रियंका गांधींच्या निवडीवर वाद विवाद सुरु असताना अभिनेत्री पायल रोहतगीने वापरलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पायल रोहतगीने टीका करताना सनी लिओनीचा उल्लेख केल्याने तिला नेटिझन्सच्या संतापाला सामोरं जावं लागलं आहे.

पायल रोहतगीने टीका करताना म्हटलं आहे की, ‘ते म्हणतात की पंतप्रधान होण्यासाठी इंदिरा गांधींनी लाल बहादूर शास्त्रींना मारलं. ते म्हणतात की, इंदिरा गांधींनी मुलगा संजय गांधींची हत्या केली. ते म्हणतात की इंदिरा गांधी हुकूमशहा होत्या….आपल्याला अजून एका हुकूमशहाची गरज आहे का ? रक्त आणि दिसण्यातील साधर्म्यामुळे गुणधर्मही सारखे असू शकतात #PriyankaInPolitics’.

यानंतर अनेकांनी पायलविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका ट्विटर युजरने तू स्मृती इराणी होण्याचा प्रयत्न करत आहेस का असा प्रश्न विचारला. इतकी टीका होत असतानाही पायल थांबली नाही. तिने यामध्ये सनी लिओनीला खेचत पॉर्न स्टार म्हणून उल्लेख केला.

‘प्रियंका गांधींसोबत पॉर्न स्टार सनी लिओनीलाही उभं करा. ती बॉक्स ऑफिससोबत बेडरुम स्टोरीजमध्येही हिट आहे. दोघी बसून आपल्या पतीला प्रमोट करतील. असंही भारतीयांना गोरा रंग आवडतो आणि फुकटचं सेक्ससंबंधी ज्ञानही मिळेल’, असं ट्विट पायलने केलं.

यानंतर सोशल मीडिया युजर्सनी पायलला सुनावण्यास सुरुवात केली. एका युजरने पायलला सनी लिओनीकडे तुझ्यापेक्षा जास्त आत्मसन्मान असल्याचं म्हटलं. तर एकाने दंगल चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणत म्हारी पायल किसी पॉर्न स्टारसे कम है के असा टोला लगावला.

पायल रोहतगीसाठी वाद काही नवा नाही. २०१७ मध्ये विमानतळावरील घटनेला जातीय वळण दिल्याने तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. पायल रोहतगीने काही फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय २००८ मध्ये बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात ती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 5:40 pm

Web Title: payal rohtagi trolled after compared priyanka gandhi with sunny leone
Next Stories
1 संजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक, ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरुन खोडलं नाव
2 गँग्स ऑफ वासेपूरची संगीतकार स्नेहा खानवलकर अडकली विवाहबंधनात
3 उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’
Just Now!
X