28 September 2020

News Flash

“इंग्रजी न आल्यामुळे लोक मला गावठी म्हणायचे”; अभिनेत्रीने सांगितले संघर्षाचे किस्से

"माझं लक्ष इंग्रजीवर नव्हे तर अभिनयावर होतं."

मधुरिमा तुली भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटातून नावारुपास आलेली ही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. परंतु कधीकाळी इंग्रजी भाषा बोलता न आल्यामुळे तिला लोक गावठी म्हणून चिडवायचे. असा धक्कादायक अनुभव मधुरिमाने सांगितला.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

मधुरिमा तुली एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘नाम शबाना’, ‘हमारी अधुरी कहानी’, ‘द ब्लॅक प्रिंस’, ‘वॉर्निंग’, ‘टॉस’ अशा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि काही इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. परंतु तिचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील धक्कादायक अनुभव सांगितले.

अवश्य वाचा – अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी

“मी उत्तरांचलमधील एका लहान गावातून आली आहे. शाळेत असताना अभ्यासामध्ये मी इतकी हुशार नव्हते. माझं इंग्रजी देखील चांगलं नव्हतं. त्यामुळे मला प्रचंड चिडवलं जायचं. इतकचं काय तर अभिनयसृष्टीत आल्यानंतरही इंग्रजी सुधारायला मला बराच वेळ लागला. कारण माझं लक्ष इंग्रजी ऐवजी उत्तम अभिनयाकडे होतं. अनेकदा ऑडिशनदरम्यान इंग्रजी न आल्यामुळे मला रिजेक्ट देखील करण्यात आलं आहे. अनेकांनी माझा पेहराव पाहून गावठी म्हणत माझी खिल्ली उडवली आहे. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मी खचली नाही. मी स्वत:मध्ये सुधारणा केल्या.” असा अनुभव मधुरिमाने सांगतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 4:11 pm

Web Title: people called behenji due to poor english madhurima tuli told her struggle mppg 94
Next Stories
1 रुग्णालयाला मदत करून अभिनेत्री साजरा करणार वाढदिवस
2 अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कुत्र्याने केला हल्ला; करावी लागली प्लास्टिक सर्जरी
3 ‘गेंदा फूल’वर जॅकलिनचा भन्नाट डान्स; पाहा ‘हा’ व्हिडीओ
Just Now!
X