08 March 2021

News Flash

टोळधाडीवर आधारित २०१९ मधील ‘हा’ चित्रपट ठरतोय चर्चेचा विषय; दिग्दर्शकाला येतायत शेकडो कॉल आणि मेसेज

टोळधाडीचा अनुभव आल्याने दिग्दर्शकाला सुचली होती कथा

गेल्या काही दिवसांपासून करोनाने आधीच भयग्रस्त असलेल्या देशासमोर टोळधाडीमुळे निर्माण होणारे कृषिसंकट उभे राहिले आहे. सध्या टोळधाड राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश राज्यात आणि विदर्भातील काही भागावर आली आहे. मात्र ही टोळधाड विदर्भातील जास्त तापमान असलेला भाग वगळता राज्यात अन्यत्र येणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबईत गुरुवारी दुपारपासून  टोळधाडीच्या चित्रफिती आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या असल्या तरी अखेरीस ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये टोळधाडीचे संकट कायम आहे. येथील काही नागरिकांनी सोशल नेटवर्किंगवर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओनंतर आता एका दाक्षिणात्या चित्रपटामधील एक सीन सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटामध्ये टोळधाडीसंदर्भातील एक सीन सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

तामीळ भाषेत २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘कापान’ (Kaappaan) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील अभिनेते बमन इराणी यांनी एका श्रीमंत उद्योजकाची भूमिका साकारली होती. शेतजमीन मिळवण्यासाठी हा उद्योजक शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान करण्यासाठी टोळधाडी घडवून आणत असल्याचे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये सुर्याने प्रमुख भूमिका साकारली होती. तर ज्येष्ठ अभिनेते मोहनलालही या चित्रपटामध्ये होते. या चित्रपटामधील टोळधाडीचे सीन लोक ट्विटवर शेअर करुन लोकं सध्य परिस्थितीशी साधर्म्य असल्याचे सांगत आहेत.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

‘कापान’ चित्रपटाचे दिग्दर्शक ए.व्ही. आनंद यांना एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान टोळधाडीचा अनुभव आला होता. त्यावरुनच त्यांना ‘कापान’ची कथा सुचली होती. भारतामध्ये टोळधाडीचे सत्र सुरु झाल्यापासून आनंद यांना शेकडोच्या संख्येने कॉल आणि मेसेजेस येत आहेत. “मागील काही दिवसांपासून मला शेकडो कॉल आणि मेसेजेस येत आहेत. टोळधाड या विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल माझं आता अभिनंदन केलं जात आहे. पण मला याचा आनंद वाटत नाही. मी याबद्दल आनंदी असू शकत नाही. टोळधाडीमुळे देशात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.टोळांची संख्या वाढू नये म्हणून आपण तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे,” असं मत आनंद यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना व्यक्त केलं आहे.

“नऊ वर्षापूर्वी मी सुर्याच्या माथ्थरन या चित्रपटासंदर्भातील कामासाठी मादागास्करमध्ये होतो. आम्ही गाडीने चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जात असताना हजारो टोळ आमच्या दिशेने येताना दिसले. त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. टोळ इतक्या संख्येने होते की समोरचं काही दिसत नव्हतं. अनेक तास आम्ही गाडीमध्ये बसून होतो. ते निघून गेल्यानंतर आम्हाला तिथून निघता आलं.त्यानंतर मी स्थानिकांकडून टोळधाडीबद्दल माहिती घेतली आणि ती कापनमध्ये मी वापरलं,” असं आनंद सांगतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुर्याचा सेव्हएयम अर्व्हू (7aum Arivu) हा चित्रपट साथीच्या रोगावर आधारित आहे. त्यामुळे सुर्याच्या चाहत्यांनी तो भविष्यातील अंदाज व्यक्त करु शकतो असं मत सोशल नेटवर्किंगवर मांडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 11:35 am

Web Title: people compare locust attack to scenes in suriya tamil film kaappaan scsg 91
Next Stories
1 अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शनाआधीच मालामाल; इतक्या कोटींना विकले हक्क
2 दिवसाला ५६ हजार मेसेजेस, १८ तास काम; सोनूच्या कामाचा आवाका पाहून थक्क व्हाल अन् तरी तो म्हणतो…
3 नवाजुद्दीनच्या पत्नीला हवी पोटगी; आलियाने केली तब्बल ३० कोटींची मागणी
Just Now!
X