भारतीय राजकारणातलं जाज्वल्य व्यक्तिमत्व म्हणजे ‘बाळासाहेब ठाकरे’. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास आगामी ‘ठाकरे’ या चित्रपटातून उलगडणार आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या बायोपिकचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पण मराठी ट्रेलरमधली सर्वांत महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना खटकली ती म्हणजे बाळासाहेबांचा आवाज. बाळासाहेबांचा बुलंद आवाज चित्रपटात जमलाच नाही अशा शब्दांत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करत असतानाच अनेकांनी एका कलाकाराचं नाव सुचवलं. तो कलाकार म्हणजे एक अशी व्यक्ती आहे, जी बाळासाहेबांचा आवाज हुबेहूब काढते.

आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे चेतन शशितल यांच्या आवाजात पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचं डबिंग करा अशी जोरदार मागणी सध्या सोशल मीडियावर होत आहे. चेतन शशितल हे बाळासाहेबांचा आवाज इतका हुबेहूब काढतात की डोळे मिटून ऐकणाऱ्यांना आपण खुद्द बाळासाहेबांनाच ऐकत असल्याचा अनुभव येतो. ‘ठाकरे’ या मराठी चित्रपटात बाळासाहेबांना सचिन खेडेकरांचा आवाज देण्यात आला आहे. तर हिंदीतील आवाज हा नवाजुद्दीनचाच ठेवण्यात आला आहे. सचिन खेडेकर यांचा आवाज बाळासाहेबांच्या आवाजाशी साधर्म्य साधत नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. काहींनी तर बाळासाहेबांना राज ठाकरेंचा आवाज द्या असंही मत नोंदवलं आहे.

This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
Reactions of Political Leaders of Maharashtra in Famous Dialogues in Hindi Cinema
बाइट नव्हे फाइट…
supriya sule rohit pawar
शरद पवार गटातीन दोन नेत्यांसाठी सुप्रिया सुळेंचं पोलिसांना पत्र; पत्रात रोहित पवारांचाही उल्लेख, नेमकी काय आहे मागणी?

प्रेक्षकांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता डॉटकॉम’कडून एक पोल घेण्यात आला. ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांच्या आवाजासाठी सचिन खेडेकरची निवड चुकली असून चेतन शशितल यांची निवड योग्य ठरली असती का, असा प्रश्न या पोलद्वारे विचारण्यात आला. तेव्हा सर्वाधिक मतं ही चेतन शशितल यांच्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता प्रेक्षकांच्या या मागणीचा विचार करता चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मराठीचं डबिंग पुन्हा एकदा वेगळ्या आवाजात करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ठाकरे’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची तर अमृता राव ही त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.