03 March 2021

News Flash

VIDEO : नाचणाऱ्या साराला भिकारी समजून लोकांनी दिले होते पैसे

त्यावेळी सैफ अली खानच्या मुलीला लोकांनी समजले होते भिकारी

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी सारा एका थ्रोबॅक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या बालपणीचा एक गंमतीदार किस्सा सांगितला आहे. दुकानाबाहेर नाचणाऱ्या साराला भीक मागणारी मुलगी समजुन लोकांनी पैसे दिले होते.

लहान असताना सारा आपल्या आईसोबत दुकानात गेली होती. त्यावेळी आई खरेदी करण्यात गुंग असताना सारा दुकानाबाहेर गेली व नाचू लागली. तिचं नृत्य पाहून लोक खुष झाले आणि त्यांनी तिला भीक मागणारी मुलगी समजून पैसे दिले. हा गंमतीशीर किस्सा साराने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

सारा अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. तिने हा किस्सा कुठल्याशा मुलाखतीत सांगितला होता. या मुलाखतीचा व्हिडीओ बॉलिवूड पेज या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी साराची खिल्ली देखील उडवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 6:25 pm

Web Title: people gave money to sara ali khan assume she is begging funny video viral mppg 94
Next Stories
1 पूजा हेगडेचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; रात्री एक वाजता केला असा मॅसेज
2 Video : प्रशांत दामलेंसोबत रंगली गप्पांची संध्याकाळ
3 “२० लाख कोटींच पॅकेज ‘बबुष्का बाहुली’सारखं”; फराह खानने सरकारवर साधला निशाणा
Just Now!
X