बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर ही गरोदर असल्यापासून ते तिचं पहिलं बाळ तैमुर अली खान याच्या जन्माननंतरही तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे. तैमुर झाल्यानंतर करिनाच्या शरीरयष्टीत बदल झालेला दिसतोय. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्यानेही तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर वजन कमी करण्याकडे लक्ष दिले नव्हते. गरोदरपण आणि त्यानंतर होणारे बदल याचा एक आई म्हणून आनंद घ्यायचा असतो असे तेव्हा ऐश्वर्याचे मत होते. तिच्या वाढत्या वजनामुळे तिच्यावर बरीचशी चर्चादेखील झाली होती.  काही वर्षांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही घरी बाळाचे आगमन झाले होते. आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शेट्टीने बाळंतपणानंतर लगेच वजन घटवले होते. दरम्यान, बाळंतपणानंतर लगेच वजन घटविणे आणि शरीरयष्टीवरून झालेल्या चर्चेवर शिल्पाने भाष्य केले आहे.

नुकतेच शिल्पाच्या फिटनेस संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी तिने आई झाल्यानंतर शरीरयष्टीवरून ब-याचदा अवहेलनांना सामोरं जावं लागल्याचे सांगितले. आपल्या फिट बॉडीसाठी प्रसिद्ध असलेल्या करिनाच्या भावना आणि तिच्यावर असलेला दबाव मी समजू शकते असेही शिल्पा म्हणाली. ती म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून करिनाच्या भावना आणि तिच्यावरील दबाव मी समजू शकते. गरोदरपणानंतर माझे वजन इतके वाढले की, पाच महिने मी घराबाहेर जाऊच शकले नाही. त्यानंतर मी एकदा माझ्या पतीसोबत एका रेस्तराँमध्ये गेले होते. तिथे काही स्त्रिया बसलेल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये काहीतरी कुजबूज सुरु झाली आणि त्या माझ्याकडे बघून हसू लागल्या. त्या म्हणत होत्या की, तिला अजून वजन कमी करण्याची गरज नाहीये का? त्यावेळी मला हे समजलं की, एक अभिनेत्री असल्यामुळे मला नेहमीच माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यायला हवे.

Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
delhi chief minister arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस?

काही दिवसांपूर्वीच करिनाने तिच्या गरोदरपणाबद्दल भाष्य केले होते. ती म्हणालेली की, संकेतस्थळावरील प्रतिक्रियांनी मी दुखावले गेले होते. लोकांना इतरांबद्दल बोलायला आवडतं. पण, तुमच्यासाठी फिटनेस ही संकल्पना नक्की काय आहे, हे देखील समजून घेण्याची गरज आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. पण, सेलिब्रिटी म्हणून हे सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. गरोदरपणात आमचे वजन वाढले तरी काय फरक पडतो? तुम्ही एकदा का मनाशी वजन कमी करण्याचा निश्चय केलात की ते कठीण नसतं.