विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचे प्रतिपादन
मला अभिनेत्री, त्यातही विनोदी अभिनेत्री म्हणून अंबरनाथकरांनीच घडवले असून माझ्या यशात या शहराचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी केले. त्या अंबरनाथमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या ‘अंबर भरारी’ या संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे वेळी बोलत होत्या.

पूर्वेकडील स्व. शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक भवन येथे एका शानदार सोहळ्यात ‘अंबर भरारी’चे उद्घाटन पार पडले. त्यानिमित्ताने शहरातील नामांकित अभिनेते दाम्पत्य महेश सुभेदार आणि विशाखा सुभेदार यांची प्रकट मुलाखत ‘लोकसत्ता’चे प्रशांत मोरे आणि जगदीश हडप यांनी घेतली. संस्थेचे प्रमुख सुनील चौधरी यांनी स्वागत व आभारप्रदर्शन केले. माधुरी निकुंभ यांनी सूत्रसंचालन केले.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

महेश सुभेदार म्हणाले की, अभिनेते अशोक सराफ व पुरुषोत्तम बेर्डे यांनी १९९२ मध्ये आपणास प्रोत्साहन दिल्यानेच मी अभिनेता होऊ शकलो. या क्षेत्रात काम करतानाच जन्मगाठप्रसंगी विशाखाशी गाठ पडली आणि ती कायमची झाली असे महेश यांनी सांगितले. विशाखा सुभेदार म्हणाल्या की, पती महेश व सासू-सासरे यांच्यामुळे आज मी या शिखरावर पोहोचू शकले. कानसई गणेशोत्सव मंडळात पहिले विनोदी काम केले आणि मनाला खात्री पटली की मी विनोदी काम करू शकते. हिंदी चित्रपट सुपर नानीमध्ये अभिनेत्री रेखा यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. शेवटच्या दिवशी रेखादीदीने साडी दिली आणि मला अश्रू अनावर झाले, असे त्या म्हणाल्या.