News Flash

मलायकाने कपडे घातले की नाही? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

मलायकाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मलायका अरोरा

फिटनेसबाबत बॉलिवूड अभिनेत्री फार जागरूक असतात. फिटनेसच्यासोबतच त्यांच्या वर्कआऊट फॅशनचा नवीन ट्रेण्डच आला आहे. जिमला जाताना हे सेलिब्रिटी कशाप्रकारचे कपडे घालतात, याबाबत नेटकऱ्यांमध्ये फार क्रेझ दिसून येते. सेलिब्रिटींची जिम फॅशन चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिमबाहेर पापाराझी सज्ज असतातच. अभिनेत्री मलायका अरोराचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण वर्कआऊट फॅशनच्या नावाखाली मलायकाने नेमके काय कपडे परिधान केले आहेत हेच नेटकऱ्यांना समजेनासं झालं आहे.

या व्हिडीओमध्ये मलायका गाडीतून बाहेर येते आणि जिमच्या दिशेने चालू लागते. तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना ती पोझसुद्धा देते आणि निघून जाते. यावेळी मलायकाने स्कीन कलरचा जिमसूट परिधान केला होता. तो रंग तिच्या शरीराच्या रंगासारखाच असल्याने तिने कपडे घातले आहेत की नाहीत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आणखी वाचा : ‘अग्गंबाई सासूबाई’मधील प्रज्ञाविषयी तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का?

या कपड्यांवरून अनेकांनी मलायकाला ट्रोलसुद्धा केलं आहे. चर्चेत राहण्यासाठी मलायका काहीही करू शकते असं एकाने म्हटलं आहे. तर हे कपडे तिला अजिबात चांगले दिसत नाही, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

सध्या मलायका ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. या डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिच्यासोबत गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे परीक्षक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 3:50 pm

Web Title: people wonder if malaika arora wearing a dress or not watch video ssv 92
Next Stories
1 Guilty Movie Review : अन्याय, अत्याचाराविरोधातला हुंकार!
2 त्या वादानंतर रोहित शेट्टीने कतरिनाला केले अनफॉलो?
3 सुपरहिरो ‘थॉर’ देखील घाबरला करोना वायरसला
Just Now!
X