News Flash

प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींचा खासगी डेटा हॅक; फोन रेकॉर्डिंगचीही चोरी

हॅकर्सने केली इतक्या कोटींची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, पॉपस्टार लेडी गागा, मडोना आणि इतर अनेक प्रसिद्ध कलाकारांवर सायबर अटॅक झाला आहे. अमेरिकेतील एका नामांकित मीडिया कंपनीसह या सेलिब्रिटींचा डेटा चोरीला गेला आहे. काही अज्ञात हॅकर्सने सेलिब्रिटींचे फोन, इमेल आयडी, सोशल मीडिया अकाउंट, फोन रेकॉर्ड्स हॅक करुन त्यांची संपूर्ण माहिती चोरी केली आहे. Variety.com ने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास ७५६ जीबी माहितीची चोरी झाली आहे.

अमेरिकेचा सायबर सुरक्षा विभाग या हल्ल्याचा तपास करत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सने रॅन्समवेअर व्हायरसचा वापर केला आहे. तसेच त्यांनी दोन कोटी १० लाख अमेरिकी डॉलर्सची मागणी केली आहे. जर हे पैसे लवकरात लवकर त्यांना मिळाले नाही तर सेलिब्रिटींची सर्व माहिती डार्क वेबवर व्हायरल केली जाईल अशी धमकी देखील या गुन्हेगारांनी दिली आहे. इंटरनेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. तीन वर्षांपूर्वी रॅन्समवेअरचाच वापर करुन अमेरिकेतील रुग्णालयांवर सायबर अटॅक करण्यात आला होता. त्यानंतर होणारा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

सायबर हल्ला झालेल्या मीाडिया कंपनीचे नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. कारण ही कंपनी डिस्कव्हरी, ईएमआय म्यूझिक ग्रुप, फेसबुक, एचबीओ, आयमॅक्स, एमटीवी, एनबीए एंटरटेनमेंट, प्लेबॉय एंटरप्राइजेज, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सोनी क्रॉप, स्पोटीफाई, ट्रिबेका फिल्म फेस्टिवल, यूनीवर्सल म्यूझिक ग्रुप यांसारख्या अनेक नामाकिंत कंपन्यांसाठी काम करते. त्यांचा डेटा देखील या अटॅकमध्ये चोरीला गेला आहे. या सायबर अटॅकमुळे हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 4:10 pm

Web Title: personal data of celebrities including lady gaga and priyanka chopra hacked in data breach mppg 94
Next Stories
1 “उंच टाचांच्या चपला महिला विरोधी”; अभिनेत्रीने दिला बुट वापरण्याचा सल्ला
2 Video : नजर हटी, दुर्घटना घटी; घरकाम करणारीला किस केल्याने शिल्पा शेट्टीने केली पतीची धुलाई
3 व्हायरसवर आधारित ‘कंटेजन’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला करोनाची लागण
Just Now!
X