26 January 2021

News Flash

शाहरुखच्या ‘झीरो’ चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका

शाहरुखचा 'झीरो' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडला आहे.

'झीरो'

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘झीरो’ या चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरवर आक्षेप घेत शिखांच्या भावना दुखावल्याचा आरोप अमृतपाल सिंग खालसा नामक वकिलाने याचिकेत केला आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं. बनियानमध्ये असलेल्या शाहरुखच्या गळ्यात नोटांची माळ आणि शीखांकडून परिधान करण्यात येणारं कृपाण या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये दिसते. कृपाण हे शीखांचं धार्मिक चिन्ह असल्यामुळे या पोस्टरमध्ये त्याचा गैरवापर केल्याचा दावा खालसा यांनी याचिकेत केला आहे. तसंच याविरोधात शाहरुखसह निर्माते गौरी खान, करुणा बडवाल, दिग्दर्शक आनंद एल राय, रेड चिलीज एंटरटेन्मेंट आणि सेन्सॉर बोर्डावर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. या याचिकेवर १९ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे पैसे वसूल करून देण्यासाठी ‘वहाण’ची भन्नाट ऑफर

शाहरुखचा ‘झीरो’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत सापडला आहे. याआधी पंजाबमधील अकाली दलाचे आमदार मंजिदर सिंह सिरसा यांनी शाहरुख खानसह चित्रपटातील अन्य व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर शाहरुख कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 12:42 pm

Web Title: petition filed in bombay high court against shah rukh khan for hurting religious sentiments in zero trailer
Next Stories
1 ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे पैसे वसूल करून देण्यासाठी ‘वहाण’ची भन्नाट ऑफर
2 लेन्सच्या भीतीने काशिनाथ घाणेकर बायोपिकला नकार दिला होता- सुबोध
3 Photos : लग्नासाठी रणवीर- दीपिका इटलीला रवाना
Just Now!
X