News Flash

दिलजीतसाठी अनुष्का बनली ‘नॉटी बिल्लो’

‘फिल्लौरी’ सिनेमा ही एका भूताची प्रेमकथा आहे

'फिल्लौरी'चे नवे गाणे प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्रीने तिच्या सिनेमात गाणं गाण्याचा जणू आता ट्रेण्डच आला आहे. प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट आणि आता अनुष्का शर्मानेही एक रॅप गाणे गायले आहे. हे रॅप गाणे तिने तिचा आगामी सिनेमा फिल्लौरीसाठी गायले आहे. अनुष्का आणि दिलजितच्या हटके कथानक असलेल्या ‘फिल्लौरी’ सिनेमातील ‘नॉटी बिल्लो’ गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

पहिल्यांदा रॅप गाणे गाणारी अनुष्का, ‘फिल्लौरी’च्या या नवीन गाण्यात ‘नॉटी बिल्लो’ बनली आहे आणि मजेशीर रॅपही केले आहे. गाण्याच्या सुरुवातीला स्टेजचा पडदा उघडतो, तेव्हा अनुष्का पंजाबी मुलीच्या पेहरावात दिसते आणि नंतर नॉटी बिल्लो बनते. या गाण्यात अनुष्कासोबत दिलजीत दोसांजही एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आतापर्यंत या सिनेमाची तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘दम दम..’ हे गाणे सर्वात आधी प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर ‘वॉट्स अप’ हे लग्नसराईचे गाणे प्रदर्शित केले गेले. ‘साहिबा’ हे गाणे अनेकांच्या पसंतीस उतरले आहे.

‘फिल्लौरी’ सिनेमा ही एका भूताची प्रेमकथा आहे. अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. यात भूत दाखविण्यात आलेली शशी (अनुष्का) ही मेल्यावरही आपल्या प्रियकराच्या प्रतिक्षेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शशीच्या प्रियकराची भूमिका दिलजीतने साकारली आहे. या सिनेमाद्वारे अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज ही एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणारा अभिनेता दिलजित दोसांज आता बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावत आहे. त्यामुळे अनुष्का आणि दिलजितची एका वेगळया काळातील ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. २४ मार्चला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 7:14 pm

Web Title: phillauri song naughty billo anushka sharma raps in diljit dosanjh song watch video
Next Stories
1 टीव्हीवर ‘शक्तिमान’ पुन्हा यावा- मुकेश खन्ना
2 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ : ….हा अभिनेता साकारणार टप्पूची भूमिका
3 शाहरुख म्हणतो, …त्यासाठी मला छातीवरचे केस वाढवावे लागतील!
Just Now!
X