News Flash

PHOTO : रणबीर कपूरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दिसली ‘ती’

त्याच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये एका मुलीसोबत दिसत आहे

रणबीर कपूर

रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. कोणत्याही कामात आपले १०० टक्के देण्याकडे रणबीरचा कल असतो. सध्या तो संजयसारखे दिसण्यासाठी आणि भूमिकेत समरसून जाण्याचे प्रयत्न करत आहे. पडद्यावर दत्त जशाच्या तसा यावा यासाठी सध्या तो बराच घाम गाळतोय.

नुकताच सोशल मीडियावरील रणबीरच्या फॅन पेजवर त्याचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनमध्ये एका मुलीसोबत दिसत आहे. पण ही मुलगी नक्की कोण आहे आणि त्यांनी असा फोटो का काढला असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ही मुलगी त्याची चाहती आहे. एका जाहिरातीच्या चित्रीकरणानंतर त्यांनी हा फोटो काढला होता.

रणबीरची व्हॅनिटी व्हॅन चांगलीच प्रशस्त आहे. रणबीरचे हे दुसरे घरच आहे म्हणा ना.. ‘जग्गा जासूस’ अभिनेत्याने त्याची व्हॅन अमृता महल नकाईकडून डिझाइन करुन घेतली आहे. या व्हॅनमध्ये ‘बॅटमॅन बिगिन्स’, ‘फोर रुम्स’ अशा त्याच्या आवडत्या हॉलिवूड सिनेमांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. एक आराम खुर्ची, मोठा आरसा, एक छोटा सोफा कम बेड असे फर्निचर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आहे.
कतरिना कैफ आणि त्याचा ‘जग्गा जासूस’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यावर बोलताना रणबीर म्हणाला का, ‘जेव्हा मी लग्न करेन तेव्हा ते सगळ्यांना कळेलच. सध्या माझी आई माझ्यासाठी लंडनमध्ये जाऊन मुलगी शोधतेय अशा चर्चा सुरू आहेत. पण त्यात काही तथ्य नाही. माझ्या पालकांनी किंवा माझ्या आजीने मी लवकर लग्न करावं यासाठी अजिबात जबरदस्ती केलेली नाही. मी लग्न कोणाशी करावं आणि कधी करावं याचा निर्णय माझ्या पालकांनी माझ्यावरच सोडला आहे. मी अशा मुलीशी लग्न करेन जिच्यावर माझं प्रेम आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 5:03 pm

Web Title: photo alert ranbir kapoor snapped fan inside his luxurious vanity van
Next Stories
1 .. म्हणून सैफ-अमृता सिंगच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल
2 Ganesh Chaturthi 2017: बॉलिवूडकरांनी असे केले बाप्पाचे स्वागत
3 Judwaa 2 song Chalti Hai Kya 9 Se 12: ‘चलती है क्या ९ से १२’ गाण्याला वरुण, जॅकलिन, तापसीचा हटके ट्विस्ट
Just Now!
X