06 August 2020

News Flash

चेतन आणि पर्णचा ‘फोटोकॉपी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

तरुणाईचे भावविश्व टिपणारा चित्रपट.

आजच्या तरुणाईचे भावविश्व टिपणारा ‘फोटोकॉपी’ हा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पौगंडावस्थेत झालेल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक करेल. ‘फोटोकॉपी’मध्ये चेतन चिटणीस हा फ्रेश चेहरा मुख्य भूमिकेत दिसणार असून, नाट्यसृष्टीत नावाजलेली अभिनेत्री पर्ण पेठे एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, सोबत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका आहे. ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत कधीही न हाताळल्या गेलेल्या पद्धतीने बनवलेला असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल, असा विश्वास ‘वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स’चे सीओओ अजित अंधारे यांनी व्यक्त केला. मराठी चित्रपट नेहमीच एका उंचीवर राहिला असून, आता त्याच्या आर्थिक आकडेवाढीमुळे तो अधिकच दर्जेदार आणि उच्च पातळीवर गेला असल्याचे त्यांनी सांगितले. आपली पहिलीच निर्मिती असलेल्या ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाचे प्रदर्शन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत नावाजलेले ‘वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स’ सोबत करायला मिळत असल्याबद्दल खूप आनंदी असल्याची भावना चित्रपटाच्या निर्मात्या नेहा राजपाल यांनी व्यक्त केली. चित्रपटाची पटकथा आणि संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी यांनी लिहिले आहेत. रोमँटिक कॉमेडी पठडीतला हा चित्रपट १६ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय मौर्य यांनी केले आहे.

parna-chetan

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:49 pm

Web Title: photo copy slated for release on september 16
Next Stories
1 ‘गोवा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘हाफ तिकीट’
2 हॅप्पी बर्थडेः साध्या पद्धतीने रिंकूचा वाढदिवस साजरा करणार- महादेव राजगुरु
3 शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्राची प्रतिक्रिया
Just Now!
X