10 April 2020

News Flash

कियाराच्या त्या ‘टॉपलेस’ फोटोशूट दरम्यानचा फोटो व्हायरल; फोटोतून झाला नवा खुलासा

नव्याने व्हायरल झालेल्या फोटोमुळे कियाराच्या टॉपलेस फोटोसंदर्भात नवी माहिती समोर

कियारा आडवाणी

फोटोशूटसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवडत्या फोटोग्राफर्सपैकी एक असणारे फोटोग्राफर म्हणजे डब्बू रत्नानी. सेलिब्रिटींमध्ये खास लोकप्रिय असणारे डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशित करतात. नुकतंच त्यानी २०२० चे नवीन ‘सेलिब्रिटी कॅलेंडर’ही प्रकाशित केलं. यंदाच्या कॅलेंडरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आहेत. हे कॅलेंडर अभिनेत्रींच्या टॉपलेस फोटोंमुळे विशेष चर्चेत आहे. या कॅलेंडरसाठी अभिनेत्री कियारा आडवाणी, सनी लिओनी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. कियाराने तर या फोटोशूटमधील आपला फोटो इन्स्ताग्रमावरुन शेअर केला. त्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. मात्र आता या फोटोसंदर्भात एक नवीनच माहिती समोर येत आहे.

‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कियारा आडवाणीने हिनेही डब्बु रत्नानीच्या कॅलेंडरासाठी टॉपलेस फोटोशूट केलं. रत्नानी यांनी काढलेल्या फोटोमध्ये कियारा हिरव्या रंगाचे मोठ्या आकाराचे पान आपल्या छातीसमोर पकडून उभी असल्याचे दिसत आहे. कियाराने कॅलेंडर प्रदर्शित झाल्यानंतर इन्स्ताग्रामवर हा फोटो पोस्ट केला. त्यानंतर अनेकांनी फोटोशॉप करुन तिला कपडे घातल्याचे फोटो तयार करुन ते व्हायरल केले. मात्र आता या फोटोसंदर्भात नवा खुलासा झाला आहे. या फोटोमागील सत्य सांगणारा एक फोटो नेटकऱ्यांनी सध्या व्हायरल केला आहे.

पाहा फोटो >> Dabboo Ratnani 2020 Calendar : सेलिब्रिटींचे भन्नाट फोटो

 

View this post on Instagram

 

A leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

काय आहे व्हायरल फोटोमध्ये?

कियाराने रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस झाल्याचे वृत्त असले तरी असं काहीही झालं नसल्याचा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो म्हणजे रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट करताना क्लिक करण्यात आलेल्या फोटोंपैकी एक आहे. एका कॅमेराच्या स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या या फोटोशूटमधील कियाराच्या फोटोमध्ये तिने स्क्रीन कलरचे कपडे घातल्याचे दिसत आहे. मोठ्या आकाराच्या पानाच्या मागे उभ्या असणाऱ्या कियाराचा फोटो हा अशा पद्धतीने काढण्यात आला आहे की टॉपलेस असल्याचा भास होतो, असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.

पाहा फोटो >> या १४ अभिनेत्रीही फोटोसाठी झाल्या होत्या टॉपलेस

कियारा आणि सनीबरोबरच विद्या बालन, भूमि पेडणेकर, जॅकलीन फर्नांडिस, क्रिती सेनन यासारख्या अभिनेत्रींनीही या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं आहे. याचबरोबर अभिषेक बच्चन, सैफ अली खान, विकी कौशल यांनीही यावर्षीच्या कॅलेंडरसाठी शूट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:21 pm

Web Title: photo of kiara advani topless photoshoot went viral scsg 91
Next Stories
1 शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई
2 ‘ब्रेकअप के बाद’ १३ वर्षांनी करिना म्हणते, “शाहिद आणि माझ्यात…”
3 वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर स्वरा भास्कर म्हणाली…
Just Now!
X