04 March 2021

News Flash

फोटोकॉपी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे

प्रेम… म्हणजे प्रत्येकाच्या मनात एका व्यक्तीसाठी असलेली विशेष भावना. प्रेमाच्या या गुलाबी रंगात न्हाऊन निघालेले अनेक हृदय आपल्याला पाहायला मिळतील. तारुण्याने बहरलेल्या या हृदयात जेव्हा प्रेमाची पालवी उमलते तेव्हा आयुष्य खूप सुंदर होते, म्हणूनच आयुष्यात प्रेम गरजेचे असते, प्रेमाची हीच परिभाषा आगामी ‘फोटोकॉपी’ या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. आपल्या सुरेल आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा राजपाल आपल्याला आता नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘फोटोकॉपी’ या सिनेमाच्या निमित्ताने निर्मात्याच्या भूमिकेत ती आपल्यासमोर येत आहे. नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या नवोदित कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहे, तर या दोघांसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. व्हायकॉम इंटरनॅशनल आणि नेहा राजपाल यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 7:23 pm

Web Title: photocopy marathi films trailer release
Next Stories
1 पाहाः सिद्धार्थ मल्होत्रा का घाबरतो सोनाक्षीला
2 त्या मुलीला लागला ‘बेबी डॉल’चा लळा
3 ‘बिग बॉस १०’ चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित
Just Now!
X