News Flash

सोशल मीडियावर व्हायरल होतोय तैमुरचा ‘हा’ निरागस फोटो

बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब अनेकांनाच भुरळ घालतोय

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या कुटुंबाचा त्रिकोण २०१६ च्या डिसेंबर महिन्यात पूर्ण झाला. ‘सैफिना’च्या जीवनात छोट्या नवाबाचं आगमन झालं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबात आणि प्रेक्षक वर्गातही आनंदाची लाट पसरली. सेलिब्रिटी किड्समध्ये तैमुरच्या नावाचीच चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून होत आहे. याच चर्चांमध्ये आता त्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘इन्सटण्ट बॉलिवूड’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमुरचा हा फोटो पोस्ट केला आहे. त्याचा हा फोटो पाहताना निरागस तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत असल्याचं आपल्या लगेचच लक्षात येईल.

डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब आतापासूनच त्याचा थाट अनुभवत आहे असं म्हणायला हरकत नाही. सैफच्या या छोट्या नवाबाची पहिली झलक जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमुरच्या फोटोला पसंती दिली होती. बाळाच्या येण्याने सध्या प्रचंड आनंदात असणारा ‘डॅडी’ सैफ तैमुरला फार काळासाठी स्वत:पासून दूर ठेवत नाहीये ही बाबही तितकीच महत्त्वाची.

तैमुरसाठी असणारी करिनाची ओढही काही लपलेली नाही. करिनाने तिच्या मुलाबद्दल म्हणजेच तैमुरबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता सर्वांचाच विश्वास बसला आहे असंच म्हणावे लागेल. ‘माझा मुलगाच सर्वात सुंदर’ आहे असे करिना काही दिवसांपूर्वी बोलली होती. तैमुरच्या जन्मानंतर सोशल मिडियावर ज्याप्रमाणे त्याच्या विषयीच्या विविध चर्चांना उधाण आलं होतं. सध्या तसंच काहीसं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तैमुरवरुन कोणाचीच नजर हटत नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 7:34 pm

Web Title: photograph of kareena kapoor and saif ali khans son taimur ali khan goes viral on social media
Next Stories
1 PHOTOS: ‘क्वीन’ कंगनाचा राजमहाल पाहिलात का?
2 वायूदलाच्या ‘त्या’ ऑपरेशनवर लवकरच चित्रपट; शाहरुख साकारणार लीड रोल?
3 PHOTO – बर्थडे सेलिब्रेशनसाठी कतरिना-रणबीर एकत्र येतात तेव्हा..
Just Now!
X