News Flash

PHOTOS : ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत भाव खातेय बॉलिवूडची ‘मस्तानी’

आगामी 'पद्मावत' चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चेत आहे.

दीपिका पदुकोण

आगामी ‘पद्मावत’ चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ येत्या २५ जानेवारीला अखेर प्रदर्शित होतोय. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला असल्यामुळे यात ‘राणी पद्मावती’ म्हणजेच ‘पद्मिनी’ची भूमिका साकारणारी दीपिका आता तिच्या इतर कामांमध्ये व्यस्त झाली आहे. नुकतेच तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले.

वाचा : संजय कपूरच्या करिअरची गाडी रुळावर येईना!

जाहिरातीमधील ट्रॅफिक पोलिसाच्या वेषातील दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डोळ्यांवर गॉगल लावलेली दीपिका जीपवर रुबाबात बसल्याचे फोटोंमध्ये दिसते.

‘पद्मावत’ चित्रपट १ डिसेंबर २०१७ला प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, चित्रपटाला होत असलेला विरोध आणि भन्साळी तसेच दीपिकाला आलेली जीवे मारण्याची धमकी यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटामध्ये पाच बदल सुचवत २५ जानेवारीला ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. या पाच बदलांमध्ये चित्रपटाचे शीर्षक ‘पद्मावती’वरून ‘पद्मावत’ असे करण्यात आले.

वाचा : सलमानने लावली जीवाची बाजी!

‘पद्मावत’मध्ये दीपिकाव्यतिरीक्त शाहिद कपूर आणि रणवीर सिंग हे महारावल रतन सिंह आणि सुलतान अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात तीन गाणी असून, त्यापैकी ‘घुमर’ आणि ‘एक दिल एक जान’ ही दोन गाणी आधीच प्रदर्शित करण्यात आली आहेत. तर ‘खली बली’ हे तिसरे गाणे या आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 1:02 pm

Web Title: photos amidst padmaavat controversies deepika padukone turns a traffic cop and chills like a boss
Next Stories
1 हृतिक ठरला जगातील सर्वात ‘हॅण्डसम’ अभिनेता, हॉलिवूड अभिनेत्यांवर केली मात
2 शिल्पाच्या ‘मेटॅलिक साडी’ची चर्चा
3 तापसी पन्नूच्या ब्रेकअपची अफवा
Just Now!
X