News Flash

‘टायगर जिंदा है’मध्ये दिसणार कधीही न पाहिलेली रोमांचक साहसदृश्ये

चित्रपटात उत्तम दर्जाची साहसदृश्ये साकारण्यावर भर देण्यात आला आहे.

टायगर जिंदा है

सलमान खानच्या प्रत्येक आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. सध्या तो ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनाच चित्रपटाविषयीची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि कतरिना कैफ भन्नाट साहसदृश्ये करताना दिसणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत कधीही न साकारालेल्या भूमिकांना सलमान आणि कतरिना न्याय देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तूर्तास या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सलमान एका कारमधून शत्रूवर निशाणा साधताना दिसतो आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये सुरक्षा दलाच्या एका टीमसोबत कतरिना दिसते आहे. या फोटोमध्ये ही सर्व टीम एका हॅलिकॉप्टरच्या पुढे उभी असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात उत्तम दर्जाची साहसदृश्ये साकारण्यावर भर देण्यात आला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

भाईजान सलमान आणि कतरिना यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटासाठी पट्टीच्या कलाकारांची मदत घेण्यात आली आहे. ‘बॅटमॅन- ग डार्क नाइट’ या चित्रपटातील साहसदृश्यांचे दिग्दर्शन केलेल्या टॉम स्ट्रथर्स यांच्या मार्गदर्शनानुसार ‘टायगर…’मधील साहसदृश्ये साकारण्यात आली आहेत. हॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘स्टंट परफॉर्मर’ टॉम यांनी त्यांच्या टीमसह ‘टायगर जिंदा है’मधील थरार आणखी वाढवला आहे. अबु धाबीमध्ये या चित्रपटाच्या जास्तीत जास्त साहसदृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी हॅलिकॉप्टर, मोठमोठ्या कार्स, चित्रीकरणासाठी लागणारी सैन्याची वाहने आणि शस्त्रास्त्रे या साऱ्याची सोयही करण्यात आली होती. या साहसदृश्यांमध्ये कमालीचे बारकावे टीपण्यात आले असून, आता ते चित्रपटासाठी कितपत फायद्याचे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2017 3:15 pm

Web Title: photos bollywood movie tiger zinda hai bollywood actor salman khan and actress katrina kaif action sequences
Next Stories
1 VIDEO: …म्हणून वरुण धवनने आलियाला ‘किस’ करण्यास दिला नकार
2 ‘साहो’च्या सेटवर नवा नियम
3 शाहरुखला पाहण्यासाठी ‘मन्नत’ बाहेर चेंगराचेंगरी
Just Now!
X