आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे ब्रेकअप झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील. आलिया आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपचे नेमके कारण कोणालाही कळले नाही. पण असे म्हटले जात होते की, सिद्धार्थ आणि जॅकलीनमधील जवळीक यासाठी कारणीभूत ठरली. त्यानंतर अनेक ठिकाणी हे दोघे दिसण्यात आले पण त्यांनी एकमेकांना ओळखही दाखवली होती. पण नुकत्याच एकता कपूरच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीमध्ये हे क्युट कपल एकत्र दिसले.

Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Sajjad lone baramulla loksabha
Loksabha Election: बारामुल्लामधून पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सज्जाद लोन?
Abdu Rozik
तस्कर अली असगर शिराजी प्रकरण: अब्दू रोझिक ईडी कार्यालयात दाखल
View this post on Instagram

A post shared by Filmy News (@filmynews_)

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या पार्टीला आवर्जुन हजेरी लावली होती. पण इतर कलाकारांपेक्षा प्रसारमाध्यमांच्या नजरा खिळल्या होत्या त्या आलिया आणि सिद्धार्थवर. दोघंही या पार्टीत अगदी मनमुराद गप्पा मारताना दिसले. यात सिद्धार्थपेक्षा आलियाच जास्त आनंदी दिसत होते. दोघांनी एकत्रित येऊन प्रसारमाध्यमांना फोटोसाठी पोझही दिल्या. ते दोघे बोलण्यात इतके दंग होते की छायाचित्रकार त्यांचे फोटो काढत आहेत, हे लक्षातही आले नाही. त्यामुळे आलिया आण सिद्धार्थचे पॅचअप झाले का, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

लवकरच आलिया ‘राझी’ सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण पहलगावमध्ये होत असून आलिया चित्रीकरणासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाही दिसते. ‘राझी’ या सिनेमात आलिया वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ती चित्रीकरणादरम्यान मेकअप न करताच सेटवर येते. त्यामुळे या सिनेमात आलिया मेकअपशिवाय पाहायला मिळणार की काय?, असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे.