News Flash

HT Most Stylish Awards 2017 : ‘एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७’ विजेत्यांची संपूर्ण यादी

नुकताच 'एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७' चा सोहळा पार पडला.

एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७

नुकताच ‘एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७’ चा सोहळा पार पडला. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांनी महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरले. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. दीपिका पदुकोण, वरुण धवन, आलिया भट्ट, सुशांत सिंग राजपूत, दिशा पटानी, काजोल, अजय देवगण, नवाजुद्दीन सिद्दीकी, सिद्धार्थ मल्होत्रा यांसह अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. पद्मावती अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘मोस्ट स्टायलिश ग्लोबल आयकॉन’ पुरस्कार पटकावला.

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ फेम अभिनेता वरुण धवनने यावर्षीचा लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. तर शाहिद कपूरने यावर्षीचा ‘मोस्ट स्टायलिश’ अभिनेत्याचा पुरस्कार पटकाविला. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांना ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ तर अजय देवगणला ‘मोस्ट स्टायलिश सुपरस्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांना एचटीचा ‘मोस्टर स्टायलिश टाइमलेस कपल’ हा पुरस्कार देण्यात आला. तर परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराणा यांनी ‘युथ आयकॉन ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावला.

एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७ विजेत्यांची संपूर्ण यादी

फ्रेश फेस ऑफ द इयर (अभिनेता) – सूरज पांचोली
फ्रेश फेस ऑफ द इयर (अभिनेत्री)- दिशा पटानी
मोस्ट स्टायलिश ग्लोबल आयकॉन – दीपिका पदुकोण
परफॉर्मर ऑफ द इयर (अभिनेता)- नवाजुद्दीन सिद्दीकी
परफॉर्मर ऑफ द इयर (अभिनेत्री)- तापसी पन्नू
युथ आयकॉन ऑफ द इयर (अभिनेता)- आयुषमान खुराणा
युथ आयकॉन ऑफ द इयर (अभिनेत्री)- परिणीती चोप्रा
लोकप्रिय अभिनेता- वरुण धवन
मोस्ट स्टायलिश अभिनेता-  शाहिद कपूर
मोस्ट स्टायलिश सुपरस्टार- अजय देवगण
स्टार ऑफ द मिलेनियम- अमिताभ बच्चन
मोस्टर स्टायलिश टाइमलेस कपल- ऋषी कपूर आणि नीतू कपूर

img_2467

आलिया भट्ट

img_2505

शाहिद कपूर

img_2449

सिद्धार्थ मल्होत्रा

img_2421

अनुष्का शर्मा

img_2333

तापसी पन्नू

img_2322

एशा

img_2291

दीपिका पदुकोण

img_2281

आयुषमान खुराणा

img_2238

दिशा पटानी

img_2146

परिणीती चोप्रा

img_2106

ऋषी कपूर आणि नीतू कपूर

img_2097

सूरज पांचोली

img_2054

अमिताभ बच्चन

img_2021

सुशांत सिंग राजपूत

img_1966

काजोल, अजय देवगण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:30 pm

Web Title: photos ht most stylish awards 2017 complete winners list deepika padukone varun dhawan win top honours
Next Stories
1 इंग्रजीत ‘फेल’ पण करिअरमध्ये ‘सुपरहिट’!
2 चित्ररंग : भूत-वर्तमानाचा सुरस खेळ
3 प्रेक्षकांसाठी ‘पर्यटन’ मालिका!
Just Now!
X