11 December 2017

News Flash

PHOTOS : असे होते दयाबेनचे ‘बेबी शॉवर’

मालिकेचे सहकलाकारही होते उपस्थित

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 2, 2017 5:09 PM

दिशा वकानी

टेलिव्हिजनची सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच आई होणार आहे. दिशा गरोदर असून नुकताच तिच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. मुंबईतील पवई येथील तिच्या घरी रविवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. दिशाचे कुटुंबिय आणि मालिकेतील तिचे सहकलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिशा खूपच सुंदर होती. फुलांपासून बनवण्यात आलेले सुरेख दागिने तिच्यावर उठून दिसत होते. ‘तारक मेहता..’ या मालिकेतील तिचे सहकलाकार दिलीप जोशी (जेठालाल), मुनमुन दत्ता (बबिता), अंबिका रंजनकर (कोमल हाथी), कवी कुमार आझाद (डॉ. हंसराज हाथी), भव्य गांधी (टप्पू), आणि समय शाह (गोगी) यांनी दिशाच्या बेबी शॉवरला हजेरी लावली.

Glad to be a part of my “reel” mother’s “real” baby shower ceremony.

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97) on

वाचा : सोनम कपूर करिनावर का झाली नाराज?

दिशाने गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मयुर पांड्या याच्याशी विवाह केला. दिशाने ‘खिचडी’ या मालिकेत तर ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘मंगल पांडे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण ‘तारक मेहता..’ या मालिकेने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. मालिका सुरू झाल्यापासूनच दिशा याचा भाग आहे. आपल्या विनोदी स्वभावाने ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत आली आहे. ती साकारत असलेली दयाबेन ही भूमिका आता सर्वांच्या आवडीची झाली आहे. १७ सप्टेंबर रोजी मालिकेतील तिचा शेवटचा भाग चित्रीत केला होता.

First Published on October 2, 2017 5:09 pm

Web Title: photos of baby shower daya ben of taarak mehta ka ooltah chashmah