News Flash

PHOTO : रामोजी राव यांच्या नातीचा शाही लग्नसोहळा

रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांची नात साहरी हिचा शाही लग्नसोहळा

प्रसिद्ध व्यावसायिक, निर्माता आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांची नात साहरी हिचा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. इनाडुचे व्यवस्थापकीय संचालक किरण आणि मार्गादर्सीच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांची साहरी ही मुलगी आहे. साहरीने बायोटेक फर्मचे अध्यक्ष कृष्णा यांचे पुत्र विरेंद्र देव याच्याशी शुक्रवारी लग्न केले.

वाचा : ‘लागिर झालं जी’ फेम शिवानीचा नववधू लूक व्हायरल

विरेंद्र देव हा हैद्राबाद येथील जेनोम व्हॅलीतील फार्मासिटीकल कंपनीची मालकी असलेल्या सुचित्रा आणि श्री कृष्णा एल्ला यांचा मुलगा आहे. राजकीय नेते, व्यावसायिक, मीडियातील नामांकित व्यक्ती, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती रामोजी फिल्म सिटीत झालेल्या या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव त्यांच्या कुटुंबासह उपस्थित होते. सुपरस्टार कृष्णा, व्यंकय्या नायडू, चंद्रबाबू नायडू, बालकृष्ण, व्यंकटेश, चिरंजीवी, पवन कल्याण, टी हरिश राव, जना रेड्डी, शब्बीर अली तर बॉलिवूडमधून अभिषेक बच्चन यांच्यासह अनेकांनी या शाही लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली हेसुद्धा या लग्नाला उपस्थित होते.

वाचा : कॉमेडीचा ‘बेताज बादशहा’ जॉनी वॉकर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी..

पदवीधर असलेली साहरी ही इनाडु ग्रुपची भावी व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता आहे. तिला ब्रुहती आणि दिविजा या दोन लहान बहिणी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:02 pm

Web Title: photos ramoji rao grand daughter sahari wedding
Next Stories
1 …आणि बदरुद्दीन काजी जॉनी वॉकर झाले
2 ‘लागिर झालं जी’ फेम शिवानीचा नववधू लूक व्हायरल
3 ‘धकधक गर्ल’ आणि ‘देसी गर्ल’ करणार एकत्र काम
Just Now!
X