26 February 2021

News Flash

PHOTOS: मिशासह शाहिद-मीराचे आउटिंग

मिशाची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी

शाहिद कपूर, मीरा राजपूत कपूर

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांच्या नात्यामध्ये मिशाच्या रुपाने एक नवी बहर आली आहे असेच म्हणावे लागेल. मीरासोबतच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर मिशाचे आयुष्यात येणे हा सर्व प्रवास या दोघांसाठीही स्वप्नवत होता. इतकेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये बी-टाऊनच्या या जोडीला ‘स्टायलिश कपल’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. असे हे ‘स्टायलिश कपल’ सध्या त्यांच्या मुलीच्या म्हणजेच मिशाच्या संगोपनात जास्त लक्ष देत आहेत. मिशाच्या जन्मानंतर बरेच दिवस शाहिदने त्याच्या मुलीला प्रसारमाध्यमांच्या नजरेआड ठेवणे पसंत केले होते. पण, काही दिवसांपूर्वीच शाहिदने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मिशाचा फोटो पोस्ट करत सर्वांना मिशाची ओळख करुन दिली.

सध्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्याऱ्या शाहिदने काही क्वालिटी टाइम काढत मिशा आणि मीराला वेळ दिला. यावेळी सुद्धा नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांनी शाहिदच्या या ‘परफेक्ट फॅमिली’ला घेरले. त्यावेळी शाहिदने मोठ्या शिताफिने मिशाचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. पण, काही छायाचित्रकारांना शाहिदच्या मुलीचा फोटो काढण्यात यश मिळाले.

शाहिद आणि मीरा सध्या पूर्णवेळ मिशाला प्राधान्य देत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान मीराने आपल्या मुलीलाच आपण प्राधान्य देत आहोत असे स्पष्ट केले होते.

shahid-kapoor-mira-2

shahid-kapoor-misha

shahid-mira-2

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:54 pm

Web Title: photos shahid kapoor and mira rajput take daughter misha bollywoods one good looking family
Next Stories
1 अमिताभ यांच्या हस्ते होणार सेन्सॉरच्या नव्या कार्यालयाचे अनावरण?
2 बार्बरा मोरीनंतर या परदेशी सौंदर्यवतीमुळे हृतिक चर्चेत..
3 Sarabhai vs Sarabhai: ‘साराभाई’ मधले हे बदलं तुम्हालाही नक्की आवडतील
Just Now!
X