19 September 2020

News Flash

PHOTOS : चिमुकल्या मिशाने आजीसोबत केली शॉपिंग

आपल्या आजीसोबत गॉगल घेण्यात ही चिमुकली मग्न झाल्याचे दिसते.

शाहिद कपूरची मुलगी मिशा कपूर

बॉलिवूडमधील स्टार किड हे सध्या त्यांच्या सेलिब्रिटी आई-बाबांपेक्षाही अधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आराध्या बच्चन, अब्राम खान, आझाद राव खान, तैमुर अली खान या चिमुकल्या स्टार किड्सना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळतेय. त्यांचे फोटो सोशल मीडियावर येताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. या स्टार किड्समधील आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे मिशा कपूर.

वाचा : जान्हवी कपूर मागोमाग ‘या’ स्टार किडला लाँच करणार करण जोहर?

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची मुलगी मिशा ही नुकतीच वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त शाहिद कुटुंबासह परदेशात गेला होता. कपूर कुटुंब आता भारतात परतले असून, सोशल मीडियावरील मिशाचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहेत. नुकतीच मिशा तिच्या आजीसोबत शॉपिंगला गेलेली. शॉपिंग सेंटरमधील आजी-नातीचे काही सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या चिमुकलीच्या टीशर्टवर ‘यू मेक मी हॅप्पी’ असे लिहिलेले दिसते. खरंतर मिशाच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपणच तिला ‘यू मेक मी हॅप्पी’ असं म्हणू यात शंका नाही. आपल्या आजीसोबत गॉगल घेण्यात ही चिमुकली मग्न झाल्याचे दिसते.

वाचा : अन् प्रियांकामधील खरी मुंबईकर जागी झाली

 

डॅडी कूल शाहिद आणि मम्मी मीरासह आपला पहिला वाढदिवस लंडन येथे साजरा केल्यानंतर मिशा भारतात परतलीये. परदेशातच तिच्या बर्थडेची पार्टी होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याबद्दल शाहिद किंवा मीराकडून कोणतेही वृत्त आलेले नाही.

गेल्यावर्षी २६ ऑगस्टला मिशाचा जन्म झाला. आपल्याला मुलगी झाल्याचा आनंद तेव्हा शाहिदने ट्विटरवर शेअर करत शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले होते. त्याने ट्विट केलेले की, ती आली असून भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 8:44 am

Web Title: photos shahid kapoors daughter misha is helping her grandmother in shopping
Next Stories
1 EXCLUSIVE : उर्मिला सांगतेय गरोदरपणातील तिच्या अनुभवाबद्दल..
2 किकूची सूचक किक!, राम रहिम सिंगला शिक्षा दिल्यावर ‘एमएसजी’रहित चायनीजचा आस्वाद…
3 अस्वस्थ वाटू लागल्यावर रणबीर करायचा अमली पदार्थांचं सेवन?
Just Now!
X