News Flash

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत मनोरंजनातून प्रबोधन

शुभम-किर्तीने कठपुतळी बाहुल्यांची वेशभूषा करत दिला स्वच्छता राखण्याचा संदेश

स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून मनोरंजनासोबतच प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवा ही गोष्ट आपल्याला लहानपणापासूनच शिकवण्यात येते. घर स्वच्छ ठेवलं जातं मात्र बऱ्याचदा घरातला कचरा रस्त्यावरच फेकला जातो. घरासोबतच परिसराची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे सांगणारा प्रसंग नुकताच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये चित्रित करण्यात आला.

शुभम आणि कीर्तीने कठपुतळी बाहुल्यांच्या रुपात स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीत टाकायला हवा याचा धडा सर्वांना अनोख्या पद्धतीने दिला.

आणखी वाचा : आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी

मालिकेतल्या या नव्या प्रयोगाविषयी सांगताना शुभम ही व्यक्तिरेखा साकारणारा हर्षद अटकरी म्हणाला, “मराठीत आजवर असा प्रयोग झालेला नाही. पहिल्यांदाच अश्या पद्धतीचा ट्रॅक शूट करण्यात आला आहे. हा सीन शूट करण्यासाठी खास कोरिओग्राफरला बोलावण्यात आलं होतं. या पूर्ण सीनची कोरिओग्राफी करण्यात आली. मी आणि समृद्धीने सराव करुन हा सीन केला. या सीनच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 11:07 am

Web Title: phulala sugandh maticha marathi serial latest updates ssv 92
Next Stories
1 आली समीप लग्नघटिका.. अभिज्ञा भावेच्या हातावर रंगली मेहंदी
2 सासऱ्यांप्रमाणेच सूनबाईदेखील नृत्यात अव्वल; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या सुनेचा ‘हा’ डान्स
3 जान्हवी कपूरने जुहूमध्ये घेतलं नवीन घर; किंमत ऐकून व्हाल थक्क!
Just Now!
X